OnePlus 12 : Oneplus12 सीरिजचे दोन फोन होणार लाँच, जाणून घ्या स्टोरेज काय असेल आणि कोणत्या कलरमध्ये असतील हे स्मार्टफोन्स?
स्मार्टफोन निर्माता OnePlus सध्या नवीन स्मार्टफोन सीरिजवर काम करत आहे. OnePlus 12 लवकरच भारतात लाँच करण्याची तयारी सुरू आहे. 23 जानेवारीला जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे.
OnePlus 12 : स्मार्टफोन निर्माता OnePlus सध्या नवीन स्मार्टफोन (OnePlus) सीरिजवर काम करत आहे. OnePlus 12 लवकरच भारतात लाँच करण्याची तयारी सुरू आहे. सध्या हा फोन चिनी बाजारात उपलब्ध असून, 23 जानेवारीला जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे रंग आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल काही माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतात लाँच होणाऱ्या व्हेरियंटबाबत अनेक प्रकारच्या बातम्याही समोर येत आहेत.
OnePlus ची ही नवी सीरिज पुढील वर्षी 23 जानेवारी म्हणजेच 2024 रोजी लाँच होणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, त्याच्या लाँचिंगसाठी दिल्लीत एक इव्हेंट देखील आयोजित केला जाईल, ज्याला Smooth Beyond Belief असे नाव देण्यात आले आहे. या नव्या सीरिजअंतर्गत भारतात दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार असून, त्यातील काही स्मार्टफोनसमोर आले आहेत.
OnePlus 12 स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. यातील पहिला व्हेरियंट 12 जीबी रॅम आणि 265 जीबी स्टोरेज, तर दुसरा व्हेरियंट 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा आहे. हा फोन फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.
वनप्लस 12 स्पेसिफिकेशन्स
या सीरिजच्या स्पेसिफिकेशनबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी या फोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या फोनमध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटची बातमी आहे. फोनमध्ये तुम्हाला 5500 एमएएच ची बॅटरी मिळू शकते, जी 100 वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल म्हणजेच तुम्हाला फास्ट चार्जिंग मिळेल.
OnePlus 12R/Ace 3 , OnePlus 12R होणार लॉंच
OnePlus (OnePlus) लवकरच OnePlus Ace 3 आणि OnePlus 12R हे नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे.OnePlus Ace 3 चीनमध्ये 4 जानेवारीला लॉंच केला जाऊ शकतो, तर OnePlus 12R 23 जानेवारीला OnePlus 12 सोबत जागतिक बाजारात लॉंच होण्याची शक्यता आहे. OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स असल्याचे समोर आले आहेत.आता Ace 3 ची लाँच तारीख जवळ येत असताना, ब्रँडने मोबाईलबद्दल माहिती देण्यासाठी एक पोस्टर पोस्ट केले आहे.
OnePlus 12R चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. परंतु या लीकमधील नवीन माहिती स्टोरेजशी संबंधित आहे. OnePlus स्मार्टफोन 8GB/16GB LPDDR5x रॅम आणि 128GB (UFS 3.1) / 256GB (UFS 4.0) स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयर्न ग्रे आणि कूल ब्लू या दोन रंगांमध्ये हा फोन येणार असल्याचेही समोर येत आहे.
इतर महत्वाची बातमी-