![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपमध्ये येतंय नवं फिचर, आता फोन नंबरही लपवता येणार, युनिक युजरनेमने होऊ शकतील सगळी कामं
How to hide WhatsApp Number: व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लपवू शकता आणि अशा प्रकारे नंबर न दाखवता चॅट करणे शक्य होणार आहे.
![WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपमध्ये येतंय नवं फिचर, आता फोन नंबरही लपवता येणार, युनिक युजरनेमने होऊ शकतील सगळी कामं new feature is coming in WhatsApp you will be able to hide the phone number all the work will be done with the unique username detail marathi news WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपमध्ये येतंय नवं फिचर, आता फोन नंबरही लपवता येणार, युनिक युजरनेमने होऊ शकतील सगळी कामं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/31/71781c3d02d83146f21c52b1b424b45a1704022938799720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. कोट्यवधी लोक दररोज त्याचा वापर करतात. भारत ही WhatsApp साठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे लाखो लोक दररोज WhatsApp वापरतात. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे बरेच फायदे आहेत परंतु त्यात काही कमतरता देखील आहेत. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांना एक गोष्ट सतावत आहे ती म्हणजे येथे तुम्हाला अनोळखी व्यक्तीशी चॅट करण्यासाठीही तुमचा नंबर शेअर करावा लागतो. दरम्यान ही समस्या आता दूर करण्याचे कंपनीकडून प्रयत्न सुरु करण्यात आलेत.
नव्या फिचरवर सुरु आहे काम
बिझनेस टुडेच्या अलीकडील अहवालात, डब्ल्यूए बीटा इन्फोने म्हटले आहे की, नंबर शेअर करण्याची समस्या आता लवकरच दूर होणार आहे. कारण व्हाट्सअॅपने यावर उपाय शोधलाय. असं सांगितले जात आहे की, व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे लोकांना त्यांचा फोन नंबर न सांगता चॅट करता येईल.
फोन नंबरच्या जागी दिसणार युजरनेम
रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप यूजर्स लवकरच या फीचरचा वापर करू शकतील. या फिचरचा वापर करुन युजर्स एक युनिक असं युजरनेम तयार करु शकतील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोफाईलबाबत अधिक गोपनीयता बाळगता येईल. तसेच युजर्सना त्यांचा फोन नंबर देखील लपवता येणार आहे आणि फोन नंबर न दाखवता देखील युजर्सना चॅट करता येणार आहे. अँड्रॉइड आणि वेब यूजर्सना लवकरच या फिचरचा वापर करता येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.
युजरनेमनुसारच सर्च करता येणार
या फीचरमध्ये आणखी फीचर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. WA Beta Info नुसार, हे फीचर आणल्यानंतर युजर्स युनिक युजरनेमच्या मदतीने इतरांनाही सर्च करू शकतील. यासाठी त्यांना सर्च बारमध्ये जाऊन युजरनेम सर्च करावे लागेल. यामुळे फोन नंबर शेअर करणे ही गोष्ट पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि WhatsApp युजर्सना अधिक प्रायव्हसी बाळगता येण्यस मदत होईल.
सिलेक्टेड युजर्ससोबत चाचणी सुरु
सध्या WhatsAppची पॅरेंट कंपनी मेटाने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, व्हॉट्सअॅप आधी बीटा यूजर्सच्या निवडक ग्रुपसोबत या फीचरची चाचणी करेल. त्यानंतर व्यापक रोलआउट होईल. दरम्यान व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये साइडबारच्या लेआउटमध्येही बदल होणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)