(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mircrosoft : Windows 10 युजर्सना मोठा झटका, मायक्रोसॉफ्टने घेतला 'हा' निर्णय
Mircrosoft : मायक्रोसॉफ्ट आगामी काळात Windows 10 ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कंपनीकडून कोणतेही अपडेट मिळणार नाही.
मुंबई : मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आगामी काळात Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसाठी सुरक्षा आणि बग्ससह इतर सिस्टीमचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ या OS वर कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा सपोर्ट दिला जाणार नाही. याचा मोठा परिणाम कंपनीवर होणार असल्याचं देखील म्हटलं जातं आहे.
कॅनालिस रिसर्चनुसार, जर कंपनीने हा सपोर्ट काढला तर त्याचा परिणाम हा थेट कंपनीवर होणार आहे. तसेच 240 दशलक्ष संगणकांवर देखील परिणाम होणार असून या सर्व सिस्टम जंक होतील. तसेच, या संगणकांमधून निर्माण होणारा कचरा सुमारे 480 दशलक्ष किलोग्रॅम असेल जो सुमारे 3,20,000 वाहनांच्या बरोबरीचा असेल, असं देखील या संशोधनातून सांगण्यात आलं आहे.
मागणीवरही होणार परिणाम
विंडोज 10 वर चालवणाऱ्या सर्व संगणकांची मागणी ही सिस्टीम सपोर्ट काढून घेतल्यानंतर थांबले असं होणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच काम करतील. पण काम करताना त्यामध्ये काही समस्या किंवा बग असल्यास कंपनी त्यासाठी कोणताही सपोर्ट देणार नाही. तसेच, हॅकर्स अशा सिस्टीमवर बारीक लक्ष ठेवून असतात आणि त्याचा मोठा परिणाम देखील होऊ शकतो. यामुळे ते लाखो लोकांना लक्ष्य करू शकतात. कॅनालिस रिसर्चने सांगितले की, यामुळे कंपनीच्या संगणकांची मागणी कमी होईल
कधीपासून बंद होणार सिस्टीम सपोर्ट?
मायक्रोसॉफ्ट 10 ऑक्टोबर 2025 नंतर Windows 10 OS साठी सपोर्ट बंद करणार आहे. तसेच असं म्हटलं जात आहे की, कंपनी काही वार्षिक किंमतीसह 2028 पर्यंत सिस्टीम सपोर्ट देईल. सध्या या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पण कंपनीने जास्त किंमत आकारल्यास युजर्सना नव्या सिस्टीमसाठी स्विच करणे फायदेशीर ठरेल आणि परिणामी जुन्या सिस्टीमची मागणी कमी होईल. संशोधनात असे म्हटले आहे की कंपनी नवीन OS मध्ये AI वैशिष्ट्यांना समर्थन देणार आहे जे युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरु शकेल.
जगभरात मायक्रोसॉफ्टे मोठ्या प्रमाणावर वापरकर्ते आहेत. त्यामुळे कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कंपनीच्या या निर्णयामुळे युजर्सवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.