Jio Fiber : एक महिन्यासाठी जिओ वायफाय मिळेल एकदम मोफत; 'या' पर्यायाचा करा वापर
Jio Fiber Schemes : जिओ फायबरच्या युजर्ससाठी एक भन्नाट प्लान जिओने लाँच केला आहे. यामध्ये एक महिन्याचा वायफाय प्लान मोफत दिला जात आहे.
मुंबई : रिलायन्स जिओ वायफायला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात जिओ वायफायचे (Jio Wifi) लाखो युजर्स आहेत. हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हीटी जिओ वायफाय ऑफर करते. विशेष बाब म्हणजे जर तुम्ही लाँग टर्मसाठीच्या प्लॅनसह रिचार्ज केले तर तुम्हाला 1 महिन्यासाठी मोफत वायफाय सेवांचा अॅक्सेस दिला जात आहे. याशिवाय यूजर्सना फ्री वायफाय इन्स्टॉलेशनचा पर्यायही देण्यात आला आहे.
युजर्सने JioFiber पोस्टपेड प्लान निवडल्यास, त्यांना कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क द्यावे लागणार नाही. कंपनीकडून विनामूल्य WiFi इंस्टॉल करुन मिळेल. यासाठी एकाच वेळी किमान 6 महिन्यांचा वायफाय रिचार्ज करावा लागणार आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला प्रीपेड JioFiber इंस्टॉल करायचे असेल, तर तुम्हाला 1500 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क द्यावे लागेल. संपूर्ण 1 महिन्यासाठी तुम्हाला मोफत वायफायचा लाभ कसा मिळेल हे जाणून घ्या.
30 दिवसांसाठी मोफत वायफाय
जर तुम्ही JioFiber युजर्स असाल किंवा नवीन कनेक्शन घेणार असाल, तर तुम्हाला कंपनी 30 दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळवून देत आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही वायफाय प्लॅनमधून पूर्ण 12 महिन्यांसाठी रिचार्ज केल्यास, तुम्हाला त्याच प्लॅनचे फायदे 1 महिन्यासाठी मोफत दिले जातील. म्हणजेच 12 महिन्याच्या रिचार्जमध्ये तुम्हाला 13 महिन्यांचा रिचार्ज मिळेल.
जर तुम्ही, तुमच्याकडे असलेला सध्याचा JioFiber प्लान 6 महिन्यांसाठी रिचार्ज केल्यास, यामध्ये तुम्हाला 15 दिवसांसाठी मोफत कनेक्टिव्हिटी दिली जाईल. सहा महिन्यांनंतरही त्याच प्लानचा लाभ पुढील 15 दिवस मोफत मिळणार. तुम्ही 30mbps ते 1Gbps स्पीड असलेली कोणताही प्लान निवडू शकता. यात, तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळेल.
जिओ एअर फायबर लाँच
रिलायन्स जिओने 19 सप्टेंबर, गणेश चतुर्थीपासून जिओ एअर फायबरची सेवा लाँच केली आहे. जिओ एअर फायबरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. JioAirFiber ही सेवा JioFiber सारख्या फायबर-ऑप्टिक कनेक्शन प्रमाणेच हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी ऑफर करते. मात्र, AirFiber सेवेत वायरिंगची आवश्यकता न ठेवता वैयक्तिक वाय-फाय नेटवर्कसाठी ट्रू 5G (Truth 5G) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. युजर्ससाठी अनुकूल सेटअपमध्ये साधी प्लग-अँड-प्ले फंक्शनचा वापर करता येतो. त्यामुळे युजर्सना त्यांचे वाय-फाय हॉटस्पॉट सहजपणे तयार करता येतात.
JioFiber हे अधिक स्थिर हाय-स्पीड देते. परंतु कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अधिक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. दुसरीकडे, Jio AirFiber हे फक्त एक डिव्हाइस आहे. युजर्सने फक्त खरेदी करणे आणि ते चालू करणे आवश्यक आहे. हे वायफाय हॉटस्पॉट सारखे कार्य करते, पण इंटरनेटचा वेग हायस्पीडने असतो.
डिसेंबरपर्यंत देशभरात 5G रोलआऊट होणार
Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा असणार आहे.