(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhone 15 series: आयफोन 15ची प्रतीक्षा लवकरच संपणार, आयफोन 15च्या सीरिजमध्ये फास्ट चार्जिंग फिचर मिळणार?
iPhone 15 series: अॅपल कंपनीकडून लवकर आयफोन 15 ची सीरिज लाँच करण्यात येणार आहे. काय खास आहे या सीरिजमध्ये तसेच या सीरिजच्या किंमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
iPhone 15 series: आताच्या तरुण पिढीमध्ये आयफोनचे (Iphone) युजर्स अधिक आहेत जे आयफोनच्या नव्या सीरिजची सातत्याने प्रतिक्षा करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अॅपलकडून सतत्याने अॅपलच्या सीरिजमध्ये अपडेट करण्यात येतात. भारतामध्ये बहुप्रतिक्षित आयफोन 15 (Iphone 15 and 15 pro) ची सीरिज येत्या सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अॅपलकडून भारतात आयफोन 14 सीरिज देखील गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च करण्यात आली होती. त्यामुळे कंपनीसाठी आयफोनच्या नेक्स्ट जनरेशनची घोषणा इतक्या लगेच करणे थोडे अवघड असल्याने यासंबंधी अधिकृत घोषणा कंपनीकडून अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु ही सीरिज येत्या सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
आयफोन 15 च्या सीरिजची किंमत
आयफोन 15 ची सर्वसाधरणपणे किंमत ही 80,000 हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर आयफोन 15 प्रो या मॉडेलची किंमत 1,30,000रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जेव्हा आयफोन 14 भारतात लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत ही 79,900 रुपये होती तर आयफोन 14 प्रो या मॉडेलची किंमत ही 1,29,000 हजार रुपये इतकी होती.
कसा असणार आयफोन 15
आयफोनच्या या सीरिजमध्ये कंपनी त्यांचे बटनलेस डीझाइन फिचर या सीरिजमध्ये ठेवणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आयफोन त्यांच्या जुन्या म्युट बटनामध्ये देखील बदल करणार आहे. अॅपलच्या अल्ट्रा वॉचचे कस्टमायजेबल फिचर बटन या सीरिजमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु हे फिचर आयफोनच्या प्रोच्या काही मर्यादित मॉडेलमध्येच ठेवण्यात येईल. आयफोन 15 च्या या सीरिजमध्ये डिसप्ले हा पातळ बेजल्समध्ये असल्याने युजर्सना त्याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच युजर्स या सीरिजमध्ये अॅपलच्या लाइटनिंग पोर्टऐवजी युएसबी टाइप-सी पोर्ट असण्याची अपेक्षा करत आहेत. परंतु अॅपलकडून आयफोनच्या या सीरिजच्या चार्जिंग आणि बॅटरीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
आयफोन 15 मध्ये फास्ट चार्जिंग फिचर मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन15 मॉडेल 20W या चार्जिंग स्पीडसह येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर आयफोन 15 प्रो मध्ये 27W पर्यंत चार्जिंग स्पीड मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु Android फोनच्या तुलनेत आयफोनच्या चार्जिंगचा हा स्पीड कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण तरीही आयफोन 15 प्रो हा कमी वेळात वेगवान चार्ज होण्याची शक्यता आहे. परंतु ही सीरिज लॉंच होईपर्यंत कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपल त्यांच्या येणाऱ्या सर्व सीरिजमध्ये फास्ट चार्जिंगचे फिचर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.