Instagram update : इंस्टाग्रामचं नवं फिचर तुम्ही पाहिलं का? फक्त सेल्फी मोडमध्ये करतं काम!
इंस्टाग्रामने नोट्समध्ये एक नवीन पर्याय जोडला आहे, ज्यामुळे आपण व्हिडिओ पोस्ट करू शकाल. यासाठी कंपनीने यात कॅमेरा ऑप्शनदेखील दिला आहे.

instagram update : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (instagram) वेळोवेळी अॅपमध्ये नवनवीन फीचर्स आणत असते. गेल्या वर्षी कंपनीने नोट्सचा पर्याय जोडला, ज्यामुळे लोकांना त्यांचे फॉलोअर्स काय करत आहेत याबद्दल एक प्रकारे स्टेटस अपडेट्स टाकता येतात. इंस्टाग्राममधील नोटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं टाकू शकता. तुम्ही जे गाणं ऐकत आहात ते तुम्ही नोट्समध्ये टाकून तुमच्या फॉलोअर्सना सांगू शकता, जर तुम्ही प्रवास करत असाल तर तेही इथे सांगू शकता. दरम्यान, कंपनीने नोट्समध्ये एक नवीन पर्याय जोडला आहे, ज्यामुळे आपण तिथे व्हिडिओ पोस्ट करू शकाल. यासाठी कंपनीने यात कॅमेरा ऑप्शन देखील दिला आहे.
तुम्ही फक्त 2 सेकंदाचा व्हिडिओ पाठवू शकाल
नव्या फीचरमध्ये तुम्ही फक्त 2 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर करू शकता. तुमचे फॉलोअर्स इमोजी आणि टेक्स्टच्या माध्यमातून या व्हिडिओवर रिप्लाय देऊ शकतात. आपण फक्त सेल्फी मोडमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ मित्रांसह शेअर करू शकाल. गॅलरीतून कोणताही व्हिडिओ किंवा बॅक कॅमेऱ्यातून काहीही अपलोड करता येणार नाही. स्टोरीत आणि या नव्या फिचरमध्ये फरक दिसावा म्हणून त्यांनी फक्त सेल्फी कॅमेरा वापरण्याचं ऑप्शन दिलं आहे. कंपनीने स्टोरीवर व्हिडिओ शेअर करण्याचा ऑप्शन आधीच दिला आहे.
स्टेटस सेट अपडेट कसं कराल?
-व्हिडिओ स्टेटस सेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईल फोटोवर दिसणाऱ्या प्लस आयकॉनवर क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर कॅमेऱ्याचा पर्याय तयार होईल.
-त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा शॉर्ट व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करू शकता.
-कंपनी हे अपडेट फेजमध्ये रिलीज करत आहे जे आपल्याला हळूहळू उपलब्ध होईल.
-नवीन फीचर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे अॅप अपडेट करावे लागेल.
इंस्टाग्रामवरुन रिल्स कसे डाऊलनोड कराल?
इंस्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे, आपण जागतिक स्तरावरील सार्वजनिक रील त्यांच्या अकाऊंटवरून डाउनलोड करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाउनलोड केलेल्या रील्स थेट कॅमेरा रोलमध्ये किंवा गॅलरीत येतील. हे फीचर सुरुवातीला जूनमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते, पण आता डाऊनलोडचा पर्याय पब्लिक रील्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे फीचर आयओएस तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असेल. त्यामुळे आता आपल्याचा हवं ते रील डाऊनलोड करता येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
