एक्स्प्लोर

How to Transfer E-Sim: फक्त iPhone नाही तर आता Android युजर्सही ट्रान्सफर करू शकतात E-SIM, जाणून घ्या कसे?

फक्त iPhone नाही तर आता Android E-SIMयुजर्सही ट्रान्सफर करू शकणार आहात. त्यामुळे आता android युजर्सही E-sim वापरु शकणार आहात. हे कसं वापरायचं पाहूयात...

How to Transfer E-Sim: पूर्वी फक्त फिजिकल सिमकार्डचा वापर (Smartphone)  केला जात होता. मात्र, आता काही लोकांनी ई-सिम कार्ड (Sim) वापरण्यास सुरुवात केली आहे. या डिजिटल काळात आणि सायबर क्राईमच्या युगात प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी फिजिकलपेक्षा ई-सिमकार्ड चांगलं आहे. सध्या भारतात मोजकेच लोक ई-सिमकार्ड वापरतात, पण हळूहळू त्याचे युजर्स वाढत आहेत. भारतातील तिन्ही प्रमुख टेलिकॉम कंपन्या ई-सिम सुविधा देतात. अॅपल बऱ्याच काळापासून आपल्या आयफोनमध्ये ई-सिमची सुविधा देत आहे.

काही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्येही हे उपलब्ध आहे. मात्र, सध्या अँड्रॉइडची समस्या अशी आहे की, युजर्स सहजपणे एका मोबाइलवरून दुसऱ्या मोबाइलमध्ये ई-सिम ट्रान्सफर करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना मॅन्युअल मेसेज पाठवून संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. पण हे सगळं लवकरच बदलणार आहे. अँड्रॉइड डिव्हाइससाठी गुगल अँड्रॉइड 14 वरून हा पर्याय देत आहे. यापूर्वी हे फीचर फक्त पिक्सल डिव्हाइसपुरते मर्यादित होते, जे आता इतर अँड्रॉइड फोनमध्येही उपलब्ध आहे. मात्र ही सुविधा अजून मोठ्या स्तरावर रोलआउट करण्यात आलेली नाही.

डेटा कसा ट्रान्सफर कराल?

अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, एका युजरने आपला सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा सेट करताना त्याच्या एलजी व्ही 60 थिनक्यूमध्ये ई-सिम ट्रान्सफरचा पर्याय पाहिला. तसेच गॅलेक्सी फोनमधून गुगल पिक्सेल डिव्हाइसवर ई-सिम ट्रान्सफरचा पर्यायही दिसत होता. यापूर्वी जेव्हा सॅमसंगने वन यूआय 5.1 अपडेट जारी केले होते, तेव्हा सॅमसंग फोनदरम्यान फक्त ई-सिम ट्रान्सफर करण्याचा पर्याय होता. मात्र, आता सॅमसंगच्या नव्या अपडेटने या फीचरमध्ये बदल केला असून नॉन गॅलेक्सी युजर्सही ई-सिम क्यूआर कोड स्कॅन करून दुसऱ्या डिव्हाइसवर ट्रान्सफर करू शकतात.

एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये ई-सिम ट्रान्सफर करण्यासाठी नव्या फोनमधून जुन्या फोनचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे सिमकार्ड नवीनमध्ये अॅक्टिव्हेट होते. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही जुन्या डिव्हाइसवर सिमकार्ड वापरू शकता. गुगलने MWC 2023  मध्ये ई-सिम ट्रान्सफर टूलबद्दल सांगितले होते. आता सॅमसंगकडून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये हा पर्याय मिळणे म्हणजे कंपनी हळूहळू तो सर्वांसमोर आणणार आहे. सध्या पिक्सल आणि सॅमसंगच्या नव्या फोनमधील हा पर्याय लोकांना मिळत आहे.  

इतर महत्वाची बातमी-

AI feature Smartphones : DSLR सारखे फोटो आता फोनमध्ये काढता येणार; 'या' फोनमध्ये मिळतंय AI कॅमेरा फिचर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget