एक्स्प्लोर

Nokia Smartphones : Nokia स्मार्टफोन बंद होणार? स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Nokia Smartphones : नोकिया मोबाईल कंपनीवर आता वाईट दिवस आले आहेत. नोकिया मोबाईल बनवणारी कंपनी HMD Global आता आपले मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. 

Nokia Smartphones : 90 च्या दशकातील लोकांचा पहिला फोन (Nokia) कोणता विचारल्यास थेट नाव ऐकू येईल ते म्हणजे 'Nokia'. कितीही वेळा पडला, कितीही वेळा बॅटरी आणि स्क्रिन वेगळी झाली तर सगळं एकत्र जोडलं की फोन सुरु व्हायचा. मोबाईलच्या अनेक कंपन्या नसल्याने आणि चांगल्या प्रतिचे फोन असल्याने प्रत्येकाच्या हाती फक्त नोकिया फोन दिसायचा. 'Trusted Brand' म्हणून एकेकाळी नोकियाच्या मोबाईलची ओळख होती. मात्र याच नोकिया मोबाईल कंपनीवर आता वाईट दिवस आले आहेत. नोकिया मोबाईल बनवणारी कंपनी HMD Global आता आपले मोबाईल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. 

आता नोकियाला हटवून कंपनी आपले ब्रँडिंग स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने स्वत: ट्विटरवर याची घोषणा केली आहे. कंपनीने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ते लवकरच आपले ब्रँडिंग स्मार्टफोन आणणार आहेत. म्हणजेच यानंतर युजर्सला HMD Smartphone वर नोकिया दिसणार नाही आहे.  

फोनबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन Mobile World Congress (MWC 2024)  मध्ये लाँच केला जाऊ शकतो. इतकंच नाही तर एचएमडीने आणखी ही अनेक बदल केले आहेत. कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरही अनेक बदल केले जात आहेत. उदाहरणार्थ, कंपनीचे ट्विटर अकाऊंट Nokia.com ऐवजी HMD.com दिसेल.

नोकियाचे स्मार्टफोन बंद होणार?

मात्र, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण एचएमडीने आतापर्यंत नोकियाचे स्मार्टफोनही बनवत राहणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या 7 वर्षांपासून कंपनी नोकिया ब्रँडिंग स्मार्टफोन बनवत आहे. 2016 मध्ये एचएमडीने मायक्रोसॉफ्टकडून नोकिया विकत घेतला. यानंतर कंपनीने अनेक प्रयोग केले असले तरी त्याचा परिणाम नोकियाच्या मार्केट शेअरवर दिसून आला नाही. आता या निर्णयामुळे नोकिया युजर्सना मोठा धक्का बसणार आहे. 

नोकियाचं काय होणार?

यापूर्वी विंडोज ओएसवर काम करणारे नोकियाचे स्मार्टफोन मायक्रोसॉफ्ट विकत होते.नोकिया लुमिया सीरिज ही मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय स्मार्टफोन सीरिज होती, पण नंतर मायक्रोसॉफ्टने नोकिया ब्रँडचे हक्क एचएमडी ग्लोबलला विकले. तेव्हापासून एचएमडी नोकियासाठी स्मार्टफोन बनवत होती. आता एचएमडीने स्पष्टपणे सांगितले आहे की, नोकियाचे स्मार्टफोन तयार होत राहतील. मात्र HMD कंपनीला आपली ओळख वाढवायची आहे. आपल्या कंपनीला नवी ओळख द्यायची आहे. त्यामुळे या कंपनीने आपल्या नावाने स्मार्टफोन लाँच करायचं ठरवलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजचा सेल सुरू, हजारो रुपयांची होणार बचत, Bank Offers कोणते आहेत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात मोठी घसरण येण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टमध्ये दावा
पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात मोठी घसरण येण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टमध्ये दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2025 | रविवार
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
कुठं पाऊस तर कुठं उघडीप, पुढील आठवडाभर राज्यात कसं असेल हवमान? जाणून घ्या सविस्तर माहिती 
कुठं पाऊस तर कुठं उघडीप, पुढील आठवडाभर राज्यात कसं असेल हवमान? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Bank Controversy | नाशिक जिल्हा बँक: भुजबळ-कोकाटे वाद, गैरसमजाचा टोला
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
Bhandara Bridge Damage | तुफान पावसाने वाहून गेले ४ महिन्यांपूर्वीचे Bridge, निकृष्ट Construction चा फटका
World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात मोठी घसरण येण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टमध्ये दावा
पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात मोठी घसरण येण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टमध्ये दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2025 | रविवार
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
Video: ... म्हणून मी आज जिवंत आहे; अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया
कुठं पाऊस तर कुठं उघडीप, पुढील आठवडाभर राज्यात कसं असेल हवमान? जाणून घ्या सविस्तर माहिती 
कुठं पाऊस तर कुठं उघडीप, पुढील आठवडाभर राज्यात कसं असेल हवमान? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Photos: शिवरायांनी सूरत लुटलेलं धन सांभाळणारा, निसर्ग सौंदर्याचं वरदान, पुरंदरच्या तहाचा साक्षीदार 'लोहगड'
Photos: शिवरायांनी सूरत लुटलेलं धन सांभाळणारा, निसर्ग सौंदर्याचं वरदान, पुरंदरच्या तहाचा साक्षीदार 'लोहगड'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळं निधीला थोडा उशीर झाला, भरणेंचं वक्तव्य, भुजबळांची पाठराखण; अजित पवार म्हणाले, कोणत्या अपेक्षेनं ते...
लाडकी बहीण योजनेमुळं निधीला उशीर, दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
TamilNadu Train Fire Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Video: डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या डब्यात स्फोट, पण अणुस्फोटासारखी धरती हादरली, अवघ्या पंचक्रोशीत थरकाप
Raigad News : छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत करा, ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा 
छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत करा, ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा 
Embed widget