(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple Event 2023 : लॉंचिंग इव्हेंट iphone चा, पण 'हे' गॅजेट्सही होणार लॉन्च; कोणते आहेत 'हे' स्पेशल गॅजेट्स? वाचा सविस्तर
iPhone 15 Series Launch : Apple चा वंडरलस्ट इव्हेंट उद्या (12 सप्टेंबरला) आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार आहे.
iPhone 15 Series Launch : Apple उद्या (12 सप्टेंबर रोजी) iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. कंपनीने या लॉन्च इव्हेंटला 'वंडरलस्ट' असं नाव दिलं आहे. या लॉन्चिंग इव्हेंटची सारेच वाट पाहतायत. पण, तुम्हाला माहीत आहे का, या इव्हेंटमध्ये आयफोनशिवाय अनेक गॅजेट्सही लॉन्च होणार आहेत. हा लॉन्चिंग इव्हेट तुम्ही Apple च्या यूट्यूब चॅनल, ऑफिशियल वेबसाईट आणि टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम घरी बसून पाहू शकता. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.
'या' गॅजेटवर सर्वांचंच लक्ष
अनेकजण आयफोन 15 सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरीज अंतर्गत, कंपनी 4 iPhone लॉन्च करणार आहे ज्यात iPhone 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हटले जाते की, कंपनी प्रो मॅक्स ऐवजी अल्ट्रा नाव वापरू शकते. मात्र, यात कितपत खरं आहे काय आहे हे उद्या कळेलच. तुम्ही प्रो मॉडेल्स ब्लॅक, सिल्व्हर, ब्लू आणि टायटॅनियम कलरमध्ये तुम्ही आयफोन खरेदी करू शकाल. यावेळी नवीन सीरिज अनेक अपडेटसह येत आहे ज्यात यूएसबी टाईप-सी चार्जर, मोठी बॅटरी, प्रो मॉडेल्समध्ये चांगली झूम क्वालिटी, पेरिस्कोप लेन्स आणि फास्ट चार्जिंगचा समावेश आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे अपडेट्स आहेत मात्र, यात बदल देखील होऊ शकतात. iPhone 15 ची किंमत भारतात 80,000 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
आयफोन व्यतिरिक्त, 'हे' सर्व लॉन्च केले जाईल
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, आयफोनशिवाय अॅपल या इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच सीरीज, एअरपॉड्स आणि नवीन ओएसची माहितीही देईल. कंपनी iOS 17, iPadOS 17 आणि watchOS 10 वर अपडेट देऊ शकते. Apple Watch Series 9 बद्दल सांगितले जात आहे की यावेळी कंपनी अधिक चांगले हार्ट रेट सेंसर आणि U2 चिप देईल. ही सीरिज 2 आकारात उपलब्ध असेल, त्यापैकी एक 41 मिमी आणि दुसरी 45 मिमी आहे. कंपनी 49 मिमीच्या आकारात अल्ट्रा 2 लाँच करू शकते. स्मार्टवॉचमध्ये अपडेट केलेली अल्ट्रा-वाइडबँड चिप "फाइंड माय" सपोर्ट वाढवेल.
हे अपडेट AirPods Pro मध्ये आढळू शकतील
कंपनी USB Type-C चार्जरसह AirPods Pro लॉन्च करू शकते. यामध्ये तुम्हाला इतर कोणतेही हार्डवेअर अपडेट मिळणार नाहीत. तसेच, कंपनी निश्चितपणे त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट नक्कीच देऊ शकते. या इव्हेंटकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.