Google Maps : कार चालकांनो लक्ष असू द्या; नवीन वर्षात गुगल मॅप 'हे' फीचर होणार बंद
Google Maps Features : नव्या वर्षात गुगल मॅपमध्ये बदल होणार असून एक फीचर बंद होणार आहे.
Google Maps : गुगल मॅप अॅपमध्ये (Google Map) अनेक बदल करण्यात येत आहे. याचा फटका कार चालकांनाही बसणार आहे. 2020 मध्येच, Google ने घोषणा केली होती की Google Maps चे असिस्टंट ड्रायव्हिंग मोड ( Assistant Driving Mode) फीचर बंद करण्यात येणार आहेत. जवळपास 4 वर्षानंतर गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हींग फीचर बंद करणार आहे. Google Map असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फेब्रुवारी 2024 मध्ये बंद होणार आहे.
गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचर का आहे खास?
गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरमुळे फोनमध्ये एक डॅशबोर्ड मिळते. यामध्ये मीडिया सजेशन, ऑडिओ कंट्रोल आणि मॅप यांसारखी फीचर्स असतात. हे फीचर्स बंद केल्याने असिस्टेड ड्रायव्हिंग मोड Android Auto ने बदलता येईल. Android Auto हे गुगलचेच एक उत्पादन आहे, जे कार चालविण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. हे अँड्रॉइड मोबाइलला कारच्या एंटरटेन्मेंट बोर्डशी कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
कार चालकांची सोय होईल
9to5Google च्या वृत्तानुसार, Google Map ला लवकरच एक नवीन इंटरफेस मिळणार आहे. गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरमध्ये प्ले होत असलेल्या मीडियाची माहिती, नकाशे आणि स्ट्रीमिंग अॅप्सची माहिती दिली जाते, परंतु आता हे फीचर अॅपल प्ले प्रमाणे काम करेल, ज्यामुळे अँड्रॉईड युजर्स कार चालकांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच गुगल मॅपला नवीन यूजर इंटरफेस मिळेल.
Google Maps वाचवणार पेट्रोल, डिझेल
स्वत:च्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सचे इंधन बचतीचे फिचर सर्वात उपयोगाचं ठरणार आहे. हे फिचर आतापर्यंत मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होते आणि आता लवकरच भारतीय युजर्ससाठी हे फिचर अॅपमध्ये अॅड करण्यात येणार आहे.
या नव्या फीचरचे नाव आहे फ्यूल सेव्हिंग फीचर. स्वत:च्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सचे इंधन बचतीचे फिचर सर्वात उपयोगाचं ठरणार आहे.
गुगल मॅप्स फ्यूल सेव्हिंग फीचर कसे चालू करावे?
-सर्वप्रथम फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा, त्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चर किंवा अॅपमध्ये दिसणाऱ्या सुरुवातीच्या (तुमच्या नावाचं आणि आडनावाचं पहिलं अक्षर) टॅप करा.
-यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन नेव्हिगेशन ऑप्शनवर टॅप करा.
-नेव्हिगेशन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रूट ऑप्शनवर जावे लागेल, त्यानंतर Prefer fuel-efficient routes वर टॅप करा आणि हे फीचर ऑन करा.
-यानंतर इंजिन प्रकारावर क्लिक करून दिलेल्या पर्यायांमधून निवड करावी लागेल.