एक्स्प्लोर

Gmail Blue Tick: Google कडून GMAIL ब्लू टिकची सुविधा लॉन्च; कोणत्या युजर्सना मिळणार सुविधा? हे जाणून घ्या

Gmail Blue Verification: आता युजर्सना GMAIL वर ब्लू टिकची सुविधा उपलब्ध होणार आहे. पण कंपनीनं काही मोजक्या युजर्सनाच याचा फायदा मिळणार असल्याचं सांगितलं आहे.

Gmail Blue Tick : सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील रथी-महारथीमध्ये ब्लू टिकवरून चांगलाचा खेळ रंगला आहे. एलॉन मस्क यांनी पहिल्यांदा ट्विटरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी नवीन नियमावली बनवली होती. यानंतर मेटानंही आपली ब्लू टिकबद्दलची पॉलिसी जाहीर केली होती. पण आता ब्लू टिक व्हेरिफेशन हे ट्विटर आणि मेटा पुरतीच मर्यादीत राहिलं नसून YouTube, TikTok, Pinterest यांच्यासह इतर डिजिटल प्लॅटफॉर्मसही ब्लू टिक व्हेरिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

अलीकडेच लिंक्डइनकडूनही ब्लू टिक व्हेरिफिकेशनची सुविधा जाहीर केली आहे. आता या स्पर्धेत गुगलनंही (Google) उडी मारली आहे. जीमेल ब्लू टिकची (Blue Tick) सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मिळत आहे. अर्थात, गुगलकडून आपल्या काही मोजक्या युजर्सना ब्लू टिकची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा Google Workspace, G Suite Basic शी जोडलेल्या युजर्सनाच मिळणार आहे.

'या' युजर्सना मिळणार GMAIL कडून ब्लू टिक

टेक क्रंचच्या  रिपोर्टनुसार, Google काही मोजक्या जीमेल युजर्सना ब्लू टिकची सुविधा देणार आहे. हे नवीन ब्लू टिक आपोआपच त्या कंपन्याच्या नावासमोर दिसून येईल ज्यांनी जीमेलच्या BIMI फिचरचा वापर केला आहे. हे फिचर  ब्रँड इंडिकेटर फॉर मॅसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) या नावानं ओळखलं जातं. हे ब्लू टिक फक्त कंपन्यांसाठी आणि त्यांच्या नावाच्या ब्रँडसाठी असणार आहे. तसेच गुगलने  Google Workspace, G Suite Basic शी जोडलेल्या युजर्सनाच ब्लू टिकची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

हे BIMI फिचर आहे तरी काय?

गुगलने 2021 मध्ये BIMI फिचरचं लाँच केलं होतं. या फिचरनुसार, जीमेलमध्ये Awatar च्या रूपात कंपनीचा लोगो दिसण्यासाठी समोरच्या सेंडरला स्ट्राँग व्हेरिफिकेशन कोडचा वापर  करावा लागणार आहे. यानंतरच ब्रँड लोगोला व्हेरिफाईड करता येणार आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या लोगोच्या नावाच्या समोर ब्लू टिक दिसून येत असेल तर याचा अर्थ, BIMI  फिचरचा वापर केला आहे. यामुळे जीमेलवर समोरून आलेला मेल व्हेरिफाईड असून त्यावर विश्वास ठेवू शकाल. गुगलच्या म्हणण्यानसार, या नवीन फिचरमुळे अधिकृत जीमेल सेंडर्सची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे आणि ब्लू टिक असलेल्या मेलवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. या ब्लू टिकसाठी कंपनीने अजूनही फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, मेटासारखं पैसे आकारल्याची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. फक्त युजर्सला अधिकाधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी BIMI फिचरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली,एका व्यक्तीचा मृत्यू, 3 जण गंभीर, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
दिल्लीत पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, एका व्यक्तीचा मृत्यू, 30-35 विद्यार्थी अडकल्याची भीती  
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
'जर माझी लैंगिक मागणी स्वीकारली, तर..' जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप; 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
Gold Rate: गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
गुड न्यूज, एका आठवड्यात सोने चांदीच्या दरात घसरण, 24 कॅरेट सोने आणि चांदीचे नवे दर जाणून घ्या
Video: 'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
'मी सांगितलं, माझा मुलाला फिट्स येतात, वडिलांनी हातात जीव सोडला, घराखाली डीजे लावणारे म्हणतात, तुम्ही धर्मविरोधी आहात..' पुणेकर वर्षा कदमांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला
Embed widget