एक्स्प्लोर

Gmail Username Change : Gmail युजरनेम बदलण्यासाठी गुगलचं नवीन फिचर; कसं करेल काम?

गुगलकडून आता जीमेल युजरनेम बदलण्याचं फिचर्स देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही तुमची जुनी मेल आयडी हवं त्या नावाने बदलू शकता, त्यासाठी नेमकी प्रोसेस काय?

मित्रांनो, कल्पना करा... तुम्ही एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला आहात. समोर बसलेला साहेब तुम्हाला विचारतो, 'तुमचा ईमेल आयडी काय आहे?' आणि तुम्हाला सांगावं लागतं— 'क्यूट_पप्पू_९९-ॲट-जीमेल-डॉट-कॉम'... किती लाजिरवाणं वाटेल ना? 

पण आता टेंशन घेऊ नका, कारण 2026 पासून तुमचा इमेल आयडी बदलता येणार आहे. गुगलने एक नवीन फिचर्स सुरू केलंय, तेच आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात.

सध्याचा नियम असा आहे की, जर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी बदलायचा असेल, तर तुम्हाला नवीन अकाउंट उघडावे लागते. यामुळे जुने ईमेल आणि डेटा ट्रान्सफर करण्याची मोठी कसरत करावी लागते. पण गुगल एका अशा सिस्टमवर काम करत आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा जुना ईमेल अॅड्रेस बदलू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला नवीन अकाउंट उघडण्याची गरज पडणार नाही आणि तुमचा कोणताही डेटा डिलीट होणार नाही!

हे फिचर नक्की कसं चालेल, हे समजून घेऊया:

-तुम्हाला तुमच्या जुन्या अकाउंटमध्येच 'नवीन जीमेल ॲड्रेस' निवडण्याचा पर्याय मिळेल.
-एकदा का तुम्ही नवीन ॲड्रेस निवडला की, तुमचा जुना आयडी काम करेल.
-तुम्ही नवीन किंवा जुना, अशा दोन्हीपैकी कोणत्याही आयडीने लॉग-इन करू शकाल.
-महत्त्वाचं म्हणजे, जुन्या आयडीवर येणारे सर्व मेसेजेस सुरक्षित राहतील आणि आपोआप नवीन आयडीवर दिसतील.

पण थांबा! गुगलने यासाठी काही कडक अटीही घातल्या आहेत

-वर्षातून फक्त एकदाच तुमचा ईमेल आयडी बदलू शकता.
-त्यामुळे, जेव्हा तुम्ही नवीन युजरनेम निवडाल, तेव्हा ते खूप विचार करून निवडा!

तर मित्रांनो, तुम्हालाही तुमचा जुना 'अतरंगी' ईमेल आयडी बदलायचा आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा! आणि अशाच टेक अपडेट्ससाठी पाहत राहा एबीपी माझा

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil Meets Uddhav Thackeray मुंबईत मविआ एकत्र यावी अशी इच्छा, अनेक मुद्यावर सकारात्मक चर्चा
Prakash Mahajan on Raj Uddhav Thackeray Yuti : अंधारात एकट्यापेक्षा दोघे जाऊ, ठाकरेंच्या युतीवर टीका
Shiv Sainik on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंनी कमर्शियल पद्धतीने तिकीटे वाटली, शिवसैनिकांचा आरोप
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
'थाटामाटात लग्न होऊन दीड वर्ष झालं, माझे दाजी बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच नाहीत, दररोज काहीतरी गंडवागंडवी करतात'; बहिणीसाठी मेव्हणा पोहोचला पोलिस स्टेशनला पण..
Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?
Kolhapur Municipal Corporation Election: इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि 'आप'ची तिसरी आघाडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवलं; हा हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सतेज पाटलांचा हल्लाबोल
Amravati Mahayuti Formula : अमरावतीत राष्ट्रवादीला वगळून भाजप शिवसेनेची युती, जागा वाटपासाठी बैठक सुरु, संभाव्य फॉर्म्युला समोर
अमरावती महापालिकेसाठी महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर,महायुतीत कोण किती जागा लढणार? राष्ट्रवादीचं काय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
सचिन तेंडुलकरने वर्षाअखेरीला कुठे गुंतवणूक केली, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
कोल्हापूर : चक्क पोलीस ठाण्यासमोर तुंबळ हाणामारी; उचलून जमिनीवर आपटलं, लाथा बुक्क्यांचाही पाऊस
Embed widget