Twitter : ट्विटरवरुन ब्लाॅक फीचर लवकरच काढले जाणार, एलॉन मस्कने पोस्ट शेअर करत दिली माहिती
Twitter वरील एक मोठं फीचर हटवण्याच्या तयारीत एलॉन मस्क आहेत. एका एक्स पोस्टला रिप्लाय देताना एलॉन मस्कने याबाबत माहिती दिली.

Twitter Block Feature : गेल्या काही दिवसात ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. एलॉन मस्कने Twitter विकत घेतल्यापासून युझर्ससाठी अनेक नवीन फीचर आणले आहेत. आता परत एकदा Twitter मध्ये मोठा बदल होणार आहे. Twitter वरील एक मोठं फीचर हटवण्याच्या तयारीत एलॉन मस्क आहेत. एका एक्स पोस्टला रिप्लाय देताना एलॉन मस्कने याबाबत माहिती दिली. ब्लॉक हा पर्याय एक फीचर म्हणून हटवण्यात येणार आहे. केवळ डीएम (डायरेक्ट मेसेज) मध्ये ब्लॉकचा ऑप्शन उपलब्ध असेल, असं मस्कने स्पष्ट केलं.
मात्र यूझर्सकरता ब्लाॅक ऐवजी म्यूट हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला ब्लाॅक करता त्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीची एकही पोस्ट दिसत नाही किंवा संबंधित व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवू शकत नाही. मात्र, जेव्हा तुम्ही एखाद्या यूझरला म्यूट करता, तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या पोस्ट तुमच्या फीडमध्ये दिसणं बंद होतं. सोबतच, त्या व्यक्तीलाही तुमच्या पोस्ट आपल्या फीडमध्ये दिसत नाहीत. अर्थात, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन त्याच्या पोस्ट पाहू शकता. यावर अनेक यूझर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूझर्सना हा पर्याय सोयीस्कर वाटत आहे तर काही यूझर्सना हा पर्याय पटलेला नाही.
Is there ever a reason to block vs mute someone?
— Tesla Owners Silicon Valley (@teslaownersSV) August 18, 2023
Give your reasons.
काही दिवसांपूर्वी Twitter संबंधी अशीच एक माहिती समोर आली होती. ज्यामध्ये तुम्ही जर TweetDeck वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. Twitter ने TweetDeck चे नाव बदलून X Pro केले आहे. तुम्हाला हे फीचर वापरण्याकरता दर वर्षाला 6,800 रुपये द्यावे लागणार आहेत.
'या' सेवा होणार उपलब्ध!
लवकरच तुम्हाला X मध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलची सुविधा मिळेल. यामुळे अॅपवरील चॅटिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. एलॉन मस्क यांनाला ट्विटर (आता X) चीनच्या WeChat सारखे बनवायचे आहे.
ट्विटरने ही कंपनी 2011 मध्ये विकत घेतली होती
लंडनस्थित TweetDeck कंपनी ट्विटरने 2011 साली विकत घेतली होती. यासाठी ट्विटरला 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 332 कोटी रुपये मोजावे लागले होते. ट्विटरच्या TweetDeck सेवेद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या ट्विटर हँडलचे ट्वीट एकाच वेळी पाहू शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या
























