एक्स्प्लोर

Sanchar Saathi Portal : सरकारने सुरु केलं संचार साथी पोर्टल , एकावेळीच होणार तीन कामं, जाणून घ्या संपूण माहिती

केंद्र सरकारने संचार साथी पोर्टललाँच केले आहे. तुमच्या नावावर कोणी मोबाईल कनेक्शन घेतले आहे का? तुमच्या फोटोचा वापर करुन कोणी कनेक्शन घेतले आहे का? किंवा तुमचा मोबाईल हरवला आणि तो तुम्हाला ब्लॉक करता येत नाही, तर ही कामं आता क्षणार्धात होणार आहेत.

Sanchar Saathi Portal : केंद्र सरकारने संचार साथी पोर्टल (Sanchar Saathi Portal) लाँच केले आहे. दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षा आणि जबाबदारी वाढवणे हा संचार साथी पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. तुमच्या नावावर कोणी मोबाईल कनेक्शन घेतले आहे का? तुमच्या फोटोचा वापर करुन कोणी कनेक्शन घेतले आहे का? किंवा तुमचा मोबाईल हरवला आणि तो तुम्हाला ब्लॉक करता येत नाही, तर ही कामं आता क्षणार्धात होणार आहेत. यासाठी सरकारने संचार साथी  पोर्टल सुरु केले आहे. केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw)यांनी नुकतीच संचार साथी पोर्टलची सुरुवात केली आहे. मोबाईल कनेक्शन आणि टेलिकम्युनिकेशन संबंधित विविध सुधारणा करणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश असणार आहे. या सेवेचा वापर https://sancharsaathi.gov.in तुम्ही दिलेल्या लिंकच्या मदतीने करता येणार आहे. 

हे पोर्टल करेल एकावेळी तीन काम 

पोर्टलच्या लाँच वेळी मंत्र्यांनी सांगितले की या पोर्टलच्या माध्यमातून एकाचवेळी तीन गोष्टी केल्या जातील. हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन वेळीच ब्लॉक करणे हे याचे पहिले काम असेल. तसेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरची (CEIR) देखील यात सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्याच्या मदतीने हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन तात्काळ ट्रॅक किंवा ब्लॉक करता येणार आहे. 

तुमच्या मोबाईल फोनचे करता येणार केवाएम (KYM)

या पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचे कनेक्शन चेक करु शकता. या सुविधेला नो युअर मोबाईल (KYM) म्हणतात. हे पोर्टल मोबाईल वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर वापरुन लॉग इन करण्यास मदत करते आणि त्यांच्या मोबाईचे कनेक्शन चेक केले  जाऊ शकते. याद्वारे तुम्ही कोणतेही अनधिकृत किंवा चुकीचे कनेक्शन पाहून ते ब्लॉक करु शकता. 

तुमच्या सिमची ग्राहक पडताळणी होईल

या पोर्टलचे तिसरे काम म्हणजे पोर्टल तुमच्या सिमची ग्राहक पडताळणी होईल. ज्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अँड फेशियल रिकग्निशनचा (ASTR) वापर करण्यात आला आहे. तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि मालक यांना IMEI च्या मदतीने चोरी झालेल्या मोबाईल फोनबद्दल सूचना संदेश मिळेल हे या पोर्टलचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. IMEI शी संबंधित नंबर ब्लॉक करणे आणि चोरी  झालेल्या मोबाईल फोन ट्रॅक करण्याचे कामही हे पोर्टल करते. शिवाय मोबाईल खरेदी करताना तोच IMEI पूर्वी वापरला नंबर वापरला गेला असल्यास सिस्टिम वापरकर्त्यांना सूचित करते. 

फसवणुकीला बसेल आळा 

फसवणुकीला आळा बसवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्व या पोर्टलमध्ये अनन्यसाधारण आहे. दूरसंचार विभाग आणि परम सिद्धी सुपर कॉम्प्युटरने विकसित केलेल्या AI शक्तीवर चालणाऱ्या साधनांचा वापर करुन या प्रणालीने 87 कोटी मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण केले आहे. 40 लाख संशयित मोबाईल क्रमांक ओळखले असून 36 लाख मोबाईल नंबर बंद केले आहेत आणि 40,000 अधिक मोबाईल विक्रीचे ठिकाणे बंद केली आहेत. (पीओएस) हे  उपकरण लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये ग्राहकाचा एकच फोटो वापरुन अनेक कनेक्शन  घेण्यात आले आहेत. परंतु त्यांची नावे मात्र वेगळी आहेत. 

एकाच फोटोवरुन घेण्यात आले 6800 कनेक्शन

याद्वारे एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यात एकच फोटो वापरुन 6800 कनेक्शन घेण्यात आले आहेत. एकच फोटो, एकच चेहरा, मात्र नावे वेगळी आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात 5,300 कनेक्शनचे एकच फोटो, एकच चेहरा आणि नावे भिन्न वापरण्यात आली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
×
Embed widget