एक्स्प्लोर

Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

Zurich Diamond League 2023: डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरच्या भालेफेकीसह दुसऱ्या स्थानावर नाव कोरलं आहे.

भारत : भालेफेकीत (Javelin Throw) दमदार कामगिरी करणारा भारताचा खेळाडू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) डायमंड लीगमध्ये रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी अ‍ॅथलेटिक्स विश्वचषक बुडापेस्टमध्ये 88.17 मीटरमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे या स्पर्धेमध्येही त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण या स्पर्धेमध्ये त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. अवघ्या काही सेंटीमीटरने नीरजची सुवर्णपदकाची संधी हुकली. 

डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. त्याचवेळी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या झेकच्या जेकब वडलेचने 85.86 मीटरचा थ्रो केला. नीरजकडून पहिले तीन प्रयत्न हे फाऊल झाले. त्यानंतर त्याने चौथा प्रयत्नामध्ये 85.22 मीटरचा थ्रो केला. पाचव्या प्रयत्नात देखील नीरजने फाऊल केला. नीरज त्याच्या शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात 85.71 मीटरचा थ्रो करण्यात तो यशस्वी ठरला. 

अमेरिकेत होणार डायमंड लीगचे अंतिम सामने

डायमंड लीगचा अंतिम सामना 16 आणि 17 सप्टेंबर रोजी अमेरिकेत खेळवला जाणार आहे. मागील वर्षी नीरजने या स्पर्धेमध्ये बाजी मारली होती. तर यंदा देखील त्याने अव्वल 6 भालेफेकपटूंमध्ये डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सहा अव्वल भालेफेकपटूंमध्ये नीरज हा तिसऱ्या स्थानावर स्थिरावला आहे. सध्या वडलेच पहिल्या स्थानावर असून जर्मनीचा ज्युलियन वेबर हा दुसऱ्या स्थानावर आहे. 

नीरजला डायमंड लीगमध्ये मोनॅको लेग खेळणं शक्य झालं नाही. याच कारणामुळे तो 23 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नीरजशिवाय भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्याने 7.99 मीटरची उडी मारुन त्याचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. 

नीरजची सुवर्ण कामगिरी

नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. त्याने या स्पर्धेत 88.17 मीटरचा थ्रो केला. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात यंदाच्या अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. नीरजने दुसऱ्या फेरीनंतर स्पर्धेत दमदार कमबॅक केलं. त्याने दुसऱ्या फेरीनंतर  88.17 मीटरचा थ्रो केला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 चा थ्रो करुन रौप्य पदकाचा मानकरी ठरला. 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केल्यानंतर नीरज हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे नीरजच्या नावावर आणखी एक विक्रम रचला जाण्याची शक्यता या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. तर या रौप्य पदकाच्या कामगिरीनंतर नीरजच्या यशामध्ये आणखी एका पदकाची भर पडल्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातयं. 

हेही वाचा : 

Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget