एक्स्प्लोर
पांढरी दाढी पाहून झिवा म्हणते, ''पापा तुम्ही म्हातारे होताय''
भारतासह जगभरातील चाहते आणि दिग्गज खेळाडूंनी धोनीला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्याची मुलगी झिवाने दिलेल्या शुभेच्छांमुळे त्याची चिंता नक्की वाढली असेल.
मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी 37 वर्षांचा झालाय. भारतासह जगभरातील चाहते आणि दिग्गज खेळाडूंनी त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्याची मुलगी झिवाने दिलेल्या शुभेच्छांमुळे त्याची चिंता नक्की वाढली असेल.
वयाच्या 37 व्या वर्षीही क्रिकेटमध्ये हजारो-लाखोंची प्रेरणा असलेल्या धोनीला मुलगी झिवाने एका व्हिडीओत गाणं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी सध्या पांढऱ्या दाढीमध्ये दिसत आहे. हे पाहत झिवा म्हणते, “की पापा तुमचं वय आता वाढत आहे.’’Happy Birthday MS Dhoni https://t.co/m0mzZQuAVe
— शशांक शेखर (@ishashank16) July 7, 2018
बीसीसीआयने धोनीला शुभेच्छांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह इतर खेळाडू आणि झिवाने शुभेच्छा दिल्या आहेत.Happy birthday Mahi Bhai. God bless you. 💪💪😇 pic.twitter.com/YeuQ8k9oWb
— Virat Kohli (@imVkohli) July 7, 2018
इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना संपल्यानंतर संघातील खेळाडू, विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी बर्थ डे सेलिब्रेशन केलं.Wish you a very happy birthday, @msdhoni and congratulations on playing your 500th International match. May you continue to give joy and happiness to people around you and beyond. pic.twitter.com/gIUkaKxgsW
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 7, 2018
जन्मदिनाच्या पूर्वसंध्येलाच धोनीच्या नावावर मोठा विक्रम झाला. 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो तिसरा भारतीय खेळाडू बनला.#HappyBirthdayMSDhoni . May your life be longer than this stretch and may you find happiness in everything, faster than your stumpings. Om Finishaya Namaha ! pic.twitter.com/zAHCX33n1y
— Virender Sehwag (@virendersehwag) July 6, 2018
व्हीव्हीएस लक्ष्मण, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना यांच्यासह जगभरातील खेळाडूंनी धोनीला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.Happy birthday @msdhoni! Re-live his winning six that clinched India the @cricketworldcup title in 2011! 🏆 pic.twitter.com/ApdkX8W5dh
— ICC (@ICC) July 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement