एक्स्प्लोर
...लग्नानंतर आशिष नेहरा बदलला: युवराज सिंह
मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू युवराजसिंगनं एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहरा आणि जवागल श्रीनाथच्या कथित कंजुषपणाच्या गोष्टीही सांगितल्या.
युवी म्हणाला की, 'नेहरा लग्नाआधी आम्हा मित्रांवरही खर्च करायचा. पण लग्नानंतर तो बदलला. आपल्याला पत्नी आणि मुलांसाठी पैसे वाचवायचे आहेत सांगून तो हात आखडता घेतो.'
आशिष नेहरासोबतच जवागल श्रीनाथबाबतही अशाच काही गोष्टी सांगितल्या आहे. श्रीनाथसोबत अनेक वर्षे खेळूनही त्यानं कधी आपल्या खिशात हात घातला नव्हता. तब्बल 15 वर्षांच्या ओळखीनंतर श्रीनाथनं पहिली पार्टी दिली होती ती दाल-चावलची. त्या पार्टीचा फोटो आपण सोशल मीडियावर शेअर करून श्रीनाथला थँक्यू म्हटल्याची आठवणही युवीनं जागवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement