एक्स्प्लोर

Pakistan Semi Final Scenario : न्यूझीलंडच्या पराभवानंतर मोठा ट्विस्ट! पाकिस्तानसमोर सेमीफायनलचं अवघड कोडं; किती ओव्हरमध्ये चेस, किती धावांत विरोधकांना गुंडाळायचं?, जाणून घ्या गणित

Pakistan Semi Final Scenario T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इंग्लंडने हरलेली बाजी पलटवत न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला.

Pakistan Semi Final Scenario T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये शुक्रवारी (27 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात इंग्लंडने हरलेली बाजी पलटवत न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. या पराभवानंतरही न्यूझीलंडचे सेमीफायनलचे स्वप्न जिवंत आहे, पण आता पाकिस्तानसमोर ‘करो या मरो’ अशी परिस्थिती उभी ठाकली आहे. सुपर-8 मधील ग्रुप-1 मधून दक्षिण आफ्रिका आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यातील विजेता दुसरी जागा निश्चित करेल. ग्रुप-2 मधून इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उरलेली एकच जागा न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या शर्यतीतून ठरणार आहे.

न्यूझीलंडचा रनरेट घसरला

इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.390 वर आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा नेट रनरेट -0.461 असा आहे. त्यामुळे केवळ विजय मिळवून पाकिस्तानचे काम भागणार नाही, तर त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे.

पाकिस्तानचे सेमीफायनल समीकरण (Pakistan Semi Final Scenario)

पाकिस्तानचा सामना शनिवारी पल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध होणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना किमान 64 धावांनी विजय मिळवावा लागेल. जर लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल, तर 13.3 षटकांत लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण झाल्यासच पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. अन्यथा न्यूझीलंड पुढे जाईल.

न्यूझीलंड अजूनही शर्यतीत 

न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला तरी ते स्पर्धेबाहेर गेलेले नाहीत. जर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध 64 धावांपेक्षा कमी फरकाने विजय मिळाला किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना 13.3 षटकांनंतर लक्ष्य गाठता आले, तर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचेल.

रेहान अहमद–विल जॅक्सची कमाल

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था 16.5 षटकांत 6 बाद 117 अशी झाली होती. मात्र रेहान अहमद आणि विल जॅक्स यांनी अवघ्या 16 चेंडूत 44 धावांची झंझावाती भागीदारी करत सामना फिरवला. इंग्लंडने अखेर विजय मिळवत सुपर-8 फेरीत अपराजित कामगिरी कायम राखली. आता सर्वांच्या नजरा पाकिस्तान-श्रीलंका सामन्याकडे लागल्या आहेत. सेमीफायनलची शेवटची जागा कोण पटकावणार, याचा थरार शिगेला पोहोचला आहे.

हे ही वाचा -

Sourav Ganguly on Auqib Nabi : रणजी गाजवणारा, जम्मूच्या Auqib Nabiची टीम इंडियात वर्णी लागणार? क्रिकेटच्या दादाची BCCI कडे साद; पोस्ट करत म्हणाले, इंग्लंड दौऱ्यावर....

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget