(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yashasvi Jaiswal : वयाच्या एकविशीत 'यशस्वी' वाटचाल! भीम पराक्रम केलाच, पण केलेल्या चुकीवर मोठ्या मनानं माफी सुद्धा मागितली
यशस्वी जैस्वालला सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, ज्याने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच सामन्यातून जवळपास संपवले होते. जैस्वालने अवघ्या 25 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली.
Yashasvi Jaiswal : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला आणि या सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ येऊ दिले नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त नाणेफेक जिंकली, बाकी काही नाही. भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देण्यात आले आणि भारताने टी-20 फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
यशस्वी ठरला सामनावीर
भारताने 20 षटकात 4 गडी गमावून 235 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाला केवळ 191 धावा करता आल्या आणि सामना 44 धावांनी गमावला. या सामन्यातील यशस्वी जैस्वालला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले, ज्याने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच सामन्यातून जवळपास संपवले होते. जैस्वालने अवघ्या 25 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. याशिवाय क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल घेतले आणि एक झेल खूप जबरदस्त होता.
53 off just 25 deliveries 🔥🔥
— BCCI (@BCCI) November 26, 2023
Yashasvi Jaiswal's entertaining knock comes to an end as #TeamIndia finish the powerplay with 77/1 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/nwYe5nOBfk#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/OrKOlYQMTX
यशस्वी जैस्वाल ऋतुराजला सॉरी म्हणाला
प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर यशस्वीने पहिल्या टी-20 सामन्यात झालेली चूक मान्य केली आणि त्या चुकीनंतर रुतुराज गायकवाडची तत्काळ माफी मागितल्याचे सांगितले. वास्तविक, विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात यशस्वी जैस्वालने एक शॉट खेळला आणि दोन धावा झटपट धावल्या. पहिली रन पूर्ण केल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने ऋतुराजला दुसऱ्या रनसाठी बोलावले आणि जवळपास हाफवे पॉइंट गाठला. रुतुराजनेही त्याच्या हाकेवर विश्वास ठेवला आणि अर्धी खेळपट्टी आली, पण त्यानंतर जयस्वालला वाटले की आपण धावा पूर्ण करू शकणार नाही, म्हणून तो माघारी फिरला, आणि स्ट्रायकरच्या शेवटी ऋतुराजला माघारी येण्याची संधीच उरली नाही. , आणि तो धावबाद झाला आणि एकही चेंडू न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला.
दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यावर यशस्वी म्हणाला, "मी अजूनही शिकत आहे. मागच्या सामन्यात ही माझी चूक होती आणि मी ऋतुराजला सॉरी म्हणालो. मी माझी चूक मान्य केली. ऋतु भाऊ दयाळू व्यक्ती आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं आहे. मी माझे शॉट्स विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या मानसिक स्थितीवरही काम करत आहे आणि माझ्या सराव सत्रांवर विश्वास ठेवतो.
यशस्वी जयस्वालचा भीम पराक्रम
यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. पॉवरप्लेमध्ये T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी अर्धशतक झळकावणारा जयस्वाल हा तिसरा खेळाडू ठरला. 2020 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माने भारतासाठी ही कामगिरी केली होती. पॉवरप्लेमध्ये हिटमॅनने 23 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. यानंतर केएल राहुलने 2021 मध्ये दुबईमध्ये स्कॉटलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पॉवरप्लेमध्ये 19 चेंडूत 50 धावा केल्या.
भारतासाठी पॉवरप्लेमध्ये अर्धशतक झळकावणारे फलंदाज (T20 आंतरराष्ट्रीय)
53 (25 चेंडू) - यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, 2023
50 (19 चेंडू) - केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, 2021
50*(23 चेंडू) - रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन, 2020
याशिवाय यशस्वीने विराट कोहलीच्या खास विक्रमाची बरोबरी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार मारले. याआधी, भारतासाठी, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 9 चौकार मारण्याचा विक्रम केला होता. आता त्याची बरोबरी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या