India vs Australia, 2nd T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; यशस्वी जैयस्वाल तुटून पडला
यशस्वी जयस्वालने धुवाँधार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 25 चेंडूत 53 धावांचा पाऊस पाडताना 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋतुराजच्या साथीत यशस्वीने 35 चेंडूत 77 धावांची सलामी दिली.
India vs Australia, 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (26 नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली.
The future of Indian cricket. 🫡 pic.twitter.com/8YL6VdcdMU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
यशस्वी जयस्वाल तुटून पडला
पहिल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करूनही अपयशी ठरलेल्या आणि ऋतुराज गायकवाडच्या रन आऊटलाही कारणीभूत ठरलेल्या यशस्वी जयस्वालने धुवाँधार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 25 चेंडूत 53 धावांचा पाऊस पाडताना 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋतुराजच्या साथीत यशस्वीने 35 चेंडूत 77 धावांची सलामी दिली.
Jaiswal has the highest score by an Indian in Powerplay in T20I.
— Johns. (@CricCrazyJohns) November 26, 2023
- History created by Jaiswal. 🫡 pic.twitter.com/1b68oW8xIX
दुसरीकडे, या मैदानावर आतापर्यंत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 8-8 गडी राखून सहज विजय मिळवला आहे. एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे, मात्र हा विजय केवळ 6 धावांनीच झाला आहे.
Jaiswal in this T20I series: 21(8) & 53(25).
— Johns. (@CricCrazyJohns) November 26, 2023
- The future is here. 🫡 pic.twitter.com/60luCntgrI
खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व, यशस्वीच्या फलंदाजीवर काहीच परिणाम नाही!
या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला दिसून आला आहे. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांचा सामना करणे हे फलंदाजांसाठी मोठे आव्हान होते. येथील शेवटच्या T20 सामन्यात अर्शदीप आणि दीपक चहर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 9 धावांत 5 बळी घेतले होते. नुकतेच विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात मिचेल स्टार्कने नेदरलँडविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. मात्र, या सर्वाचा यशस्वीच्या फलंदाजीवर काहीच परिणाम दिसून आला नाही.
FIFTY FOR JAISWAL.....!!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 26, 2023
- He is putting on a show in Kerala, fifty from just 24 balls and it is inside the Powerplay. 🫡 pic.twitter.com/DEz4Re6h42
इतर महत्वाच्या बातम्या