Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024 : फक्त दोन तासात काय घडलं आणि पांड्याचे मुंबईत 'हार्दिक' स्वागत झाले? रोख किती कोटींचा 'खेळ' झाला??
आयपीएलमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याच्या सध्याच्या फ्रेंचायझी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड पूर्ण झाला आहे.
Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024 : आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघांनी कायम आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सनेही खेळाडूंची यादी जाहीर केली. गुजरातने कर्णधार हार्दिक पंड्याला रिटेन केल्याची बातमी झळकल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र, पुढच्या दोन तासात सगळा खेळ बदलला. हार्दिक पांड्याला रोख पैसे मोजून ट्रेड केलं आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याच्या सध्याच्या फ्रेंचायझी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड पूर्ण झाला आहे.
'इंडियन एक्स्प्रेस' दिलेल्या वृत्तानुसार रिलीज आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी उशिरा या कराराची पुष्टी झाली. रोस्टरमधून प्रसिद्ध झालेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीची पुष्टी करण्यासाठी फ्रँचायझींसाठी रविवार ही अंतिम मुदत होती. मुंबई इंडियन्सने यापूर्वी सांगितले होते की कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, पियुष चावला, आकाश मधवाल, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय सिंग, विष्णू विनोद, शम्स मुलानी आणि अर्जुन तेंडुलकर हे भारतीय खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत.
ग्रीनच्या बदल्यातील रक्कम हार्दिकसाठी मुंबईने वापरली
रिटेन्शन डेडलाइनपर्यंत, मुंबई इंडियन्सने रोमॅरियो शेफर्डला ट्रेडने विकत घेतले. टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेव्हिस, जेसन बेहरेनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन यांची मुंबई इंडियन्ससोबत बोलणी सुरू असल्याचेही फ्रेंचायझीने त्या निवेदनात म्हटले होते. आता ग्रीन दक्षिणेकडे आरसीबीकडे गेला आहे. ग्रीनच्या बदल्यातील रक्कम हार्दिकसाठी मुंबईने वापरल्याचे बोलले जात आहे.
जोफ्रा आर्चरच्या रिलीजमुळे पांड्याच्या आगमनाचा मार्ग मोकळा झाला. मुंबईने जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, झ्ये रिचर्डसन, रमणदीप सिंग, राघव गोयल, अर्शद खान आणि हृतिक शोकीन यांना सोडलं आहे. दुसरीकडे, क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये करार झाला आहे. हार्दिक पंड्याच्या बदलीबाबतही मंजुरी मिळाली आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोखीने केला जातो. मात्र यासाठी मुंबईने किती किंमत मोजली याचा खुलासा करण्यात आलेला नाही. संघ ट्रान्सफर विंडो दरम्यान संघ खेळाडू बदलू शकतात. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची डील 15 कोटींमध्ये झाला आहे.
पांड्याबाबत गुजरात आणि मुंबई यांच्यात कोणत्या प्रकारचा करार झाला आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गुजरातने पंड्याला रिटेन केले होते. पण काही काळातच मुंबईने ट्रेड केलं आहे. पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2309 धावा केल्या आहेत. त्याने 10 अर्धशतके केली आहेत. हार्दिकची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 91 धावा आहे. अष्टपैलू म्हणून त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या