एक्स्प्लोर
लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार
पैलवान मारुती जाधव यांनी या कुस्तीचे आयोजन केले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे आणि संभाजी भिडे गुरुजी ही कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
![लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार Wrestling between Kiran Bhagat vs Manjeet Singh latest updates लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/10200944/kusti.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातल्या कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली ही कुस्ती आज सायंकाळी सहाच्या सुमारास खेळवण्यात येईल.
सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या कुस्तीसाठी लोखंडी पिंजऱ्यात मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या उद्धाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांनी या कुस्तीचं आयोजन केलं आहे.
महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून 18 जानेवारीला सांगलीत पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होत आहे. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्यामधली निकाली कुस्ती या कार्यक्रमाचं आकर्षण ठरणार आहे.
ही कुस्ती लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात खेळवण्यात येणारी ही पहिलीच कुस्ती ठरणार आहे. स्वातंत्र्याआधी भारतात लोखंडी पिंजऱ्यात निकाली कुस्ती खेळण्याची पद्धत रूढ होती.
पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेच्या सांगलीतल्या स्थापनेनिमित्तानं त्या परंपरेचं पुनरुज्जीवन होणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे आणि संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)