World Cup 2023 : पांड्याची एन्ट्री होताच अय्यरचा पत्ता कट! सूर्यकुमारला प्लेईंग 11 मध्ये संधी
Team India Playing 11 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा खेळताना दिसणार आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरला आराम मिळण्याची शक्यता आहे.
Shreyas Iyer And Suryakumar Yadav : टीम इंडिया (Team India) च्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) श्रीलंका (IND vs SL) विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. पांड्या दुखापतीतून सावरला असून लवकरच तो संघासोबत खेळताना दिसेल. दरम्यान, पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने संधीचं सोनं केलं, त्यामुळे पुढील सामन्यात सूर्या प्लेईंग 11 मध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ला एकदिवसीय विश्वचषकात अद्याप काही खास कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला संघाबाहेर बसावं लागणार आहे.
हार्दिक पांड्या लवकरच संघात परतणार
सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीमध्ये मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत टीम इंडियाला आत्मविश्वास दिला आहे. सूर्याने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 49 धावांची खेळी केली होती, जिथे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले होते. अशा स्थितीत हार्दिक पांड्या परतल्यावर खराब फॉर्ममध्ये असणारा श्रेयस अय्यर बाद होऊ शकतो. श्रेयस अय्यरने या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 22.33 च्या सरासरीने 134 धावा केल्या आहेत. अय्यरने यंदाच्या विश्वचषकात फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. त्याशिवाय, अय्यर जास्त काळ मैदानात टिकत नाही. काही सामन्यांमध्ये कमी वेळात आऊट झाला आहे. गुरुवारी, 2 नोव्हेंबर रोजी भारत श्रीलंकेविरुद्ध पुढील सामना खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे.
पांड्याची एन्ट्री, अय्यरला सुट्टी
दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करू शकतो. हार्दिक दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांतून बाहेर आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानंतर सूर्यकुमार यादवला प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं जाईल, असं बोललं जात होतं. पण आता अय्यरच्या खराब कामगिरीनंतर सूर्याची नाही तर अय्यरची सुट्टी होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे. इंग्लंडपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अय्यर धावबाद झाला होता, पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने संघासाठी 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्यामुळे संघाला 229 धावांपर्यंत मजल मारता आली.
सूर्याकडे आकडे नसले, तरी संघाला विश्वास
एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमारचे आकडे खास नाहीत, पण संघाचा त्याच्यावर विश्वास आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारीच्या बाबतीत सूर्यकुमार यादव विशेष काही करू शकला नसला तरी तो अखेरपर्यंत येऊन संघासाठी झटपट धावा करू शकतो, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने संघासाठी अनेक उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. सूर्याच्या आतापर्यंत खेळलेल्या 32 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 27.61 च्या सरासरीने 718 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World Cup 2023 : तेरी हार में मेरी जीत है! पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे गणित कायम! भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा