दिप्तीचा भेदक मारा, वेस्ट इंडिजची 118 धावांपर्यंत मजल, विजयासाठी 119 धावांचे आव्हान
IND vs WI WT20 WC : विडिंजने भारताला 119 धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करताना विडिंजने 20 षटकात सहा बाद 118 धावा केल्या.
IND vs WI WT20 WC : विडिंजने भारताला 119 धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करताना विडिंजने 20 षटकात सहा बाद 118 धावा केल्या. स्टॅफनी टेलर हिने 42 तर शेमेन कँपबेल 30 धावा केल्या. त्याशिवाय शबिका गजनबी 15 आणि सी नेशन हिने 21 धावांची खेळी केली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
वेस्ट इडिजची कर्णधार हेले मॅथ्यूज हिने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूजा वस्त्राकर हिने पहिल्याच षटकात धक्का देत हेले मॅथ्यूजला बाद केले. पण त्यानंतर स्टॅफनी टेलर आणि शेमेन कँपबेल यांनी भागादारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत डाव सावरला. पण दिप्तीने एकाच षटकात दोघींना बाद करत विडिंजला बॅकफूटवर ढकलले.
दिप्तीनं वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं -
14 आणि 15 व्या षटकात वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. दिप्ती शर्माने आधी एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर दबावात आलेल्या विडिंज फलंदाजाने धावबाद होत आपली विकेट फेकली. दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. दिप्तीने शेमेन कँपबेल हिला बाद करत आधी जमलेली जोडी फोडली होती. त्यानंतर लगेच स्टॅफनी टेलर हिला बाद करत विडिंजला तिसरा धक्का दिला. दिप्तीने एकाच षटकात दोन विकेट घेत भारताला सामन्यात वरचढ केले. त्यानंतर दबावात आलेल्या विडिंजच्या फलंदाजाने धावबाद होत विकेट फेकली.
कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग 11
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह
वेस्ट इंडिज संघाची प्लेईंग 11 -
हेले मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन
टी 20 विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली पण वेस्ट इंडिज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विडिंजचा संघ इंग्लंड संघाकडून सात विकेट्सनं पराभव झाला होता. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला भारताविरोधात विजय अनिवार्य आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास विडिंजचं उपांत्य फेरीतील आव्हान आणखी कठीण होणार आहे. भारतीय संघानं विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकात धावा दिल्या. भारतीय संघाला विजयासाठी गोलंदाजीत आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी सुधारली नाही तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाजीत जेमिमा रोड्रिग्स आणि ऋचा घोष यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मध्यक्रम मजबूत दिसत आहे. त्याशिीवाय या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधाना परतण्याची शक्यता आहे.