एक्स्प्लोर

Virat Kohli POTM : पहिल्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ''मला सपोर्ट करण्यासाठी...

Virat Kohli : विराट कोहलीने ऑक्टोबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. पहिल्यांदाच त्याने हा पुरस्कार जिंकल्यानंतर खास प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Virat Kohli ICC POTM : विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये असून टी20 वर्ल्डकपमध्येतर एकहाती भारताची फलंदाजी सांभाळत आहे. त्याच्या याच कामगिरीसाठी ऑक्टोबरमधील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार (ICC Player Of the Month) त्याला मिळाला आहे. त्याने विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली. ज्यानंतर त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. विराटने दोन्ही खेळाडूंना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. पुरस्कार जिंकल्यानंतर विराटने प्रतिक्रिया देत सहकारी खेळाडूंचे आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.

पुरस्कार जिंकल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे. मला सपोर्ट करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मागील काही महिन्यांमध्ये मला खूप सहकार्य केलं. सर्व फॅन्स आणि टीममधील साथिदारांचे आभार." विराट कोहलीने प्रथमच आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्याने कोहली फॅन्ससह भारतीय क्रिकेटचाहते कमालीचे आनंदी आहेत.

वर्ल्डकपमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी

विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासून विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. सर्वात पहिला भारताचा सामना पाकिस्तानसोबत झाला. ज्यात एकीकडे भारतीय फलंदाजी ढासळत असताना विराटनं एकहाती झुंज दिली. त्याने सामना जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 62 धावा विराटनं केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट 12 धावाच करु शकला. पण मग बांगलादेशविरुद्ध विराट 44 चेंडूत 62 धावा करुन पुन्हा फॉर्मात परतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने 26 धावा केल्या असून अशारितीने एकूण 5 सामन्यात त्यानं 246 धावा केल्या आहेत.  

महिलांमध्ये निदा दारनं मारली बाजी

महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget