IND vs ENG, T20: है तय्यार हम! इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, VIDEO
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात सुरु टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी अॅडलेडच्या मैदानात उतरणार आहे.
IND vs ENG T20 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत थेट सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. आता 10 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघासाठी फायनलचं तिकिट मिळवण्याकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे. दरम्यान याचसाठी भारत अगदी कसून सराव करत आहे. टीम इंडियाचा नेट प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ-
BREAKING:
— RevSportz (@RevSportz) November 8, 2022
Good news for the Indian fans, as the skipper walks back to the nets!@debasissen @BoriaMajumdar @sharmisthagoop2 @amitshah22 #BreakingNews #RohitSharma𓃵 #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/7em9p5Inhh
कसं आहे उपांत्य फेरीच्या सामन्यांचं वेळापत्रक?
सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापू्वी अर्धातास नाणेफेक होईल.
सामन्यावेळी पाऊस आला तर?
सेमीफायनल सामन्यांदरम्यान पावसाने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे नियोजित सेमीफायनल आणि फायनलच्या दिवशी मॅचचा निकाल येऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 9 नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार असून जर या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पावसाने अडथळा निर्माण केला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण केला जाऊ शकतो.
कसा असू शकतो भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा -