एक्स्प्लोर

WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय

WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्या लढतीत बंगळुरुनं मुंबईला पराभूत केलं आहे. अटीतटीच्या लढतीत बंगळुरुनं विजय मिळवत चौथ्या पर्वाची सुरुवात दमदार केली आहे.

नवी मुंबई : डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या डब्ल्यूपीएलच्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सला 3 विकेटनं पराभूत केलं. अटीतटीच्या लढतीत आरसीबीनं अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 154 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाल्यानंतर त्यांची पडझड झाली . त्यानंतर नदीन डी क्लार्कनं नाबाद 63 धावांची खेळी करत बंगळुरुला दमदार विजय मिळवून दिला आहे. आरसीबीनं 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 157 धावा करत विजय मिळवला.

बंगळुरुचा पहिला विजय

154 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीच्या स्मृती मानधना आणि हॅरिसनं 40 धावांची भागीदारी केली. कॅप्टन स्मृती मानधना ही 13 बॉलमध्ये 18 धावा करुन बाद झाली. ग्रेस हॅरिसनं 12 बॉलमध्ये 25 धावा करुन बाद झाली. तिने चार चौकार आणि एक षटकार मारला. हेमलता 12 बॉलमध्ये 7, ऋचा नं 6 बॉलमध्ये 6 धावा केल्या. राधा केवळ 1 रन करुन बाद झाली. अरुंधती रेड्डी यांनी 25 बॉलमध्ये 20 धावा करन बाद झाली. श्रेयंका पाटीलनं एक रन केली.

मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावा केल्या. मुंबईकडून सजना हिनं 45 धावा केल्या. आरसीबीसाठी नदीन डी क्लार्कनं तीन विकेट घेतल्या. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात संथगतीनं झाली. मुंबईनं पाचव्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गमावली. अमेलिया केर हिनं 15 बॉलमध्ये 4 धावा केल्या. कमलिनी 32 धावा करुन बाद झाली. हरमनप्रीत कौर हिनं 17 बॉलमध्ये 20 धावा केल्या. त्यानंतर सजना हिनं 25 बॉलमध्ये 45 धावा केल्या. निकोला कैरीनं 29 बॉलमध्ये 40 धावा केल्या.

अखेरच्या बॉलवर बंगळुरुचा विजय

बंगळुरुला अखेरच्या दोन ओव्हरमध्ये 29 धावा करायच्या होत्या.18 ओव्हरमध्ये आरसीबीनं 7 विकेटवर 126 धावा केल्या. आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये आरसीबीला 6 बॉलमध्ये 18 धावा हव्या होत्या. नदीन डी क्लार्कनं अखेरच्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि बंगळुरुला विजय मिळवून दिला. 20 व्या ओव्हरमध्ये बंगळुरुला 18 धावा हव्या होत्या. पहिल्या दोन बॉलवर बंगळुरुला एकही रन काढता आली नाही. त्यानंतर नदीन डी क्लार्कनं षटकार चौकार षटकार चौकार मारत 20 धावा करत बंगळुरुला विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्स वरील या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, स्मृती मानधनाच्या बंगळुरुनं चौथ्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
पाकिस्तानसमोर सेहवाग-द्रविड सरेंडर! आशिया कपमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी, अर्जुनची एकाकी झुंज
Team India Update : टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad
टीम इंडियात मोठा बदल! रजत पाटीदारचा अचानक संघाला रामराम, BCCI कडून नव्या उपकर्णधाराचीही घोषणा, पाहा संपूर्ण Squad
IND vs PAK U19 Asia Cup Live Streaming: सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
Embed widget