'मी देशात परत येतोय, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,' लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर नेपाळी क्रिकेटर संदीप लामिछानेची फेसबुक पोस्ट
Sandeep Lamichhane : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछानेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर आता त्याने फेसबुक पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे.
'मी निर्दोष आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे'
संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पर लिखा, "मी मोठ्या आशेने आणि विश्वासाने सांगत आहे की मी 6 ऑक्टोबर, 2022 रोजी नेपाळमध्ये परतत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध लढण्यासाठी मी स्वत:ला नेपाळ सरकारकडे स्वाधीन करत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी निर्दोष आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की नेपाळची न्यायव्यवस्था मला योग्य न्याय देईल. माझ्या सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी निर्दोष आहे.
आयपीएल खेळणारा एकमेव नेपाळचा क्रिकेटपटू
संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलाय. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे. विशेष म्हणजे संदीप लामिछानेनं 17 व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. दिल्लीच्या संघानं 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत.