एक्स्प्लोर

Deepti Sharma : दीप्ती शर्माची कमाल, 360 डिग्री फिरून श्रीलंकेच्या खेळाडूला केलं रन आऊट, पाहा VIDEO

IND W vs SL W T20 : महिला आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर विजय मिळवला असून या सामन्यात स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने कमाल फिल्डींगचं दर्शन घडवलं.

Deepti Sharma in India vs Sri Lanka : महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या (Womens Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 41 धावांनी मात दिली. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 151 धावांचं लक्ष्य दिलं असता श्रीलंका संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या सामन्यात भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या असून एक दमदार रनआऊटही केला. 

काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांवेळी मांकडिंगने विकेट घेतल्याने चर्चेत आलेल्या दीप्तीने आपली कमाल कामगिरी कायम ठेवली आहे. तिने श्रीलंका संघाविरुद्धही उत्कृष्ट रनआऊट घेतला. 5 वं षटक सुरु असताना सामन्यात श्रीलंकेची फलंदाज मलेशा शेहानी थोड्या धीम्या गतीनं रन घेत होती, त्याचवेळी दीप्तीनं अगदी चपळाई दाखवत 360 डिग्री फिरत थ्रो केला आणि शेहानीला धावचीत केलं. हाच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडीओ-

सामन्याचा लेखा-जोखा

बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 (SICS Ground 2) येथे पार पडलेल्या सामन्यात सर्वात आधी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली. भारताच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना अनुक्रमे 10 आणि 6 धावा करुन तंबूत परतल्या. त्यानंतर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत मिळून एक चांगली भागिदारी रचली. 33 धावा करुन कौर बाद झाली. पण जेमिमाने आपली झुंज कायम ठेवली. उर्वरीत फलंदाजांनी खास साथ दिली नसली तरी जेमिमाने 76 धावांची दमदार खेळी खेळत भारताची धावसंख्या पुढेपर्यंत नेली. भारताने 151 धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले. 151 धाव करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघावर भारताने सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला. हर्षिता मडवी 26 आणि हसिनी परेराच्या 30 धावा सोडल्या तर इतर श्रीलंकन महिलांना खास कामगिरी करता आली नाही. भारतीय महिलांनी मात्र आपली भेदक गोलंदाजी अखेरपर्यंत सुरु ठेवत श्रीलंकेला 18.2 षटकात 109 धावांवर सर्वबाद केलं. भारतासाठी दयालन हेमलथाने 3, पुजा वस्त्रकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर राधा यादवने 1 विकेट घेतली. 

हे ही वाचा -

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Embed widget