(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022 : जे 2011 मध्ये घडलं, तसंच यंदाही घडतंय, पुन्हा इतिहास घडणार, भारत विश्वचषक जिंकणार?
T20 WC 2022 Stats: भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 मध्ये नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. ज्यामुळे पुढील फेरीत एन्ट्रीसाठी उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं झालं आहे.
T20 World Cup 2022 : जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा संघ असूनही मागील कित्येक वर्षे भारताला विश्वचषक उंचावता आलेला नाही. 2011 मध्ये भारतानं वन डे विश्वचषकाच्या रुपात वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर अद्याप भारत कोणताच विश्वचषक जिंकू शकलेल नाही. दरम्यान यंदा ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करत असला तरी रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभूत झाल्यानं भारताचा प्रवास काहीसा अवघड झाला आहे. पण हे सारं असं असलं तरी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये घडून येणारा एक खास योगायोग सध्या सर्वांसाठीच चर्चेचा विषय घडत आहे. कारण 2011 विश्वचषकात घडलेल्या काही गोष्टी यंदाही घडत असून यामुळेच भारत यंदाही विश्वचषक उंचावेल अशी आशा फॅन्स व्यक्त करत आहेत.
सर्वात पहिला योगायोग म्हणजे भारताने नुकताच सुपर 12 ग्रुपमधील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला असून 2011 मध्येही भारताला ग्रुप स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हाव लागलं होतं. ज्यानंतर भारतानं एकही सामना गमावला नव्हता आणि थेट वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाही भारत अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. दुसरा योगायोग म्हटलं तर आयर्लंड संघानं 2011 च्या विश्वचषकातही बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिली होती. आयर्लंड आणि इंग्लंडचा खेळ पाहता इंग्लंड आयर्लंपेक्षा सरस असूनही धक्कादायकरित्या आयर्लंडनं 2011 मध्ये इंग्लंडला मात दिली. याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली. तिसरा योगायोग म्हटलं तर 2011 विश्वचषकावेळीही भारताचे दोन्ही सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांविरुद्ध झाले होते. तर यंदाही भारताचे सराव सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच होते. त्यामुळे असे काही योगायोग अगदी तसेच घडून येत असल्याने भारत यंदाही कप उंचावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भारताला उर्वरीत सामने जिंकणं महत्त्वाचं
स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं.
अशी आहे भारत असणाऱ्या ग्रुप 2 गुणतालिका
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णीत | गुण | नेट रनरेट |
1 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 0 | 1 | 5 | 2.772 |
2 | भारत | 3 | 2 | 1 | 0 | 4 | 0.844 |
3 | बांग्लादेश | 3 | 2 | 1 | 0 | 4 | -1.533 |
4 | झिम्बाब्वे | 3 | 1 | 1 | 1 | 3 | -0.050 |
5 | पाकिस्तान | 3 | 1 | 2 | 0 | 2 | 0.765 |
6 | नेदरलँड्स | 3 | 0 | 3 | 0 | 0 | -1.948 |
हे देखील वाचा-