T20 World Cup 2022: सर्वाधिक षटकार ठोकण्यात द. आफ्रिकेचा रिली रोसो पुढे, विकेट्समध्ये वानिंदु हसरंगा टॉपवर, वाचा संपूर्ण यादी
T20 WC 2022 Stats: टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 45 सामने खेळवले जाणार असून त्यातील 30 सामने आतापर्यंत पार पडले असून यातील बरेच सामने अगदी अटीतटीचे झाल्याचं दिसून आलं आहे.
ICC T20 World Cup 2022 Stats and Records : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील निम्म्याहून अधिक सामने पार पडले आहेत. पण तरीही अद्याप सेमीफायनलमध्ये नेमके कोणते संघ पोहोचणार हे स्पष्ट झालेलं नाही. कारण दोन्ही ग्रुपमध्ये चुरशीचे रंगतदार सामने होत आहेत. तर अशा या रंगतदार पार पडणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक सिक्स, सर्वाधिक विकेट्स आतापर्यंत कोणी घेतल्यात यावर एक नजर फिरवूया...
- सर्वाधित स्कोर : दक्षिण आफ्रिका संघाने बांग्लादेशविरुद्ध 5 विकेट्स गमावत 205 रन स्कोरबोर्डवर लावले होते.
- सर्वात मोठा विजय : दक्षिण आफ्रिका संघाने बांग्लादेशवर 104 धावांनी विजय मिळवला होता.
- सर्वाधिक धावा करणारा फलंदाज : श्रीलंका संघाचा सलामीवीर कुसल मेंडिसने 6 डावात 180 रन केले आहेत.
- सर्वोत्कृष्ट खेळी : दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाज रिली रोसोने बांग्लादेशविरुद्ध 109 धावांची केलेली खेळी.
- सर्वाधिक षटकार: रिली रोसो यानेच आतापर्यंत 8 षटकार ठोकले आहेत.
- सर्वाधिक विकेट्स: श्रीलंका संघाचा स्टार स्पिनर वानिंदु हसरंगाने 6 सामन्यात 10 विकेट्स मिळवले आहेत.
- सर्वोत्कृष्ट गोलंदाजी : इंग्लंडच्या सॅम करनने अफगाणिस्तानविरुद्ध 3.4 ओव्हरमध्ये 10 रन देत 5 विकेट्स घेतले.
- सर्वात मोठी भागिदारी : दक्षिण आफ्रिका संघाच्या रिली रोसो आणि क्विंटन डी कॉक यांनी बांग्लादेशविरुद्ध 168 धावांची भागिदारी केली.
- सर्वाधिक झेल : श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने 6 सामन्यात 6 कॅच घेतले आहेत.
- सर्वोत्कृष्ट बॅटिंग अॅव्हरेज : या यादीत एकमेव भारतीय विराट कोहली असून त्याने 156 या सर्वोत्कृष्ट बॅटिंग अॅव्हरेजने रन केले आहेत.
भारतासाठी सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड
स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.