IND vs NED : नेदरलँडविरुद्ध सामन्यात हार्दिक संघात नसणार? समोर आली महत्त्वाची माहिती
IND vs PAK : भारतानं पाकिस्तानवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला या विजयामध्ये हार्दिक पांड्याचं मोलाचं योगदान होतं.
Hardik Pandya : पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) सामन्यात भारतानं 4 विकेट्सनी विजय मिळवला. टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) सलामीच्या सामन्यात विजयामुळं भारताची सुरुवात दमदार झाली आहे. विशेष म्हणजे सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) विजयी कामगिरी निभावली असून त्याच्या सोबतीला होता स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya). पांड्यानं सामन्यात बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता नेदरलँडविरुद्धच्या (IND vs NED) सामन्यात हार्दिक संघात नसल्याचं समोर येत आहे. यामागील कारण त्याला विश्रांती द्यावी लागणार हे आहे.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात पांड्याला सतत पायांना क्रॅम्प येत होते. तसंच त्यानंतर आता नेदरलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या सराव सेशनदरम्यानही हार्दिक दिसला नव्हता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने (PTI) याबद्दलची माहिती दिली आहे. यामुळे हार्दिक नेदरलँडविरुद्ध विश्रांती घेऊ शकतो. नेदरलँडचा खेळ पाहता भारताला विजय मिळवणं तसं सोपं असल्याने हार्दिकसारखा स्टार खेळाडू संघात नसून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्ध हार्दिकची अष्टपैलू खेळी करत आधी गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण 40 रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच ढसाढसा रडला.
कोहलीसोबत मिळून हार्दिकची विक्रमी भागिदारी
भारत 159 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आणि सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही 15 धावा करुन बाद झाला. मग अक्षर 2 धावांवर धावचीत झाला आणि 50 धावांच्या आतच भारताचे 4 गडी तंबूत परतले. त्यानंतर मात्र विराट आणि पांड्या यांनी एकहाती डाव सावरत एक तगडी भागिदारी उभारली. दोघांनी मिळून 113 रनांची विक्रमी भागिदारी केली, ज्यानंतर 40 रनामवर पांड्या बाद झाला. सामन्याचा सामनावीर विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली आणि भारताला विजयश्री मिळवून दिला. विशेष म्हणजे भारताने टी20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.
हे देखील वाचा