एक्स्प्लोर

IND vs PAK  : उपांत्य फेरी किंवा अंतिम सामना, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने? जाणून घ्या समीकरण

IND vs PAK T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीतील लढतीत किंवा अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतात.  

India vs Pakistan T20 World Cup 2026 नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 21 फेब्रुवारीपासून सुपर  8 चे सामने सुरु होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यानं त्यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला पार पडला होता. हा सामना भारतानं 61 धावांनी जिंकला होता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अ गटातून सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. सुपर 8 मध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये सुपर 8 मध्ये सामना होणार नसला तरी उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात.  

भारतानं साखळी स्पर्धेतील सामना एकतर्फी जिंकला होता. आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा आयसीसीच्या इव्हेंटमध्येच आमने सामने येऊ शकतात. टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येण्याची शक्यता कशी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सुपर 8 मधून भारत आणि पाकिस्तान पुढे गेल्यास उपांत्य फेरीत आमने सामने येऊ शकतात.  

सुपर 8 मध्ये भारतासमोर कोणाचं आव्हान?  

टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर  8 मधील लढती ठरल्या आहेत. 8 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. ज्यामुळं भारत आणि पाकिस्तान सुपर 8 मध्ये आमने सामने येणार नाहीत. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात होते. सुपर 8 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या गटात श्रीलंका,इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान आहेत.  

उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचं गणित?

उपांत्य फेरी : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या गटात पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर  राहिले, म्हणजेच भारत X  गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान Y गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. याशिवाय पाकिस्तान Y गटात पहिल्या स्थान आणि भारत X गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीची लढत दोन्ही संघात होऊ शकते.  
 
अंतिम सामना : जर भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या लढतीत आमने सामने आले नाहीत तर अंतिम सामन्यात देखील आमने सामने येऊ शकतात. जर भारत X गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान Y गटात पहिल्या स्थानी राहिला तर या दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमने सामने येणार नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्ताननं दुसऱ्या संघांना पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतात.

उपांत्य सामना आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक 

उपांत्य फेरीतील पहिला सामना - 04 मार्च  

उपांत्य फेरीतील दुसरा सामना - 05 मार्च (मुंबई, वानखेडे स्टेडियम)

अंतिम सामना- 08 मार्च  

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget