Ind vs Sa Super-8 T20 World Cup : वैभव सूर्यवंशीसारखं खेळ, पण टायमिंगवर...; सुपर-8 आधी अश्विनचा टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला थेट मेसेज
R Ashwin on Tilak Varma : टीम इंडियाने आपल्या टी-20 विश्वचषक 2026 मोहिमेत गट टप्पातील सर्व सामने जिंकले असून आता सुपर-8 मध्ये त्याची खरी कसोटी लागणार आहे.

R Ashwin on Tilak Varma : टीम इंडियाने आपल्या टी-20 विश्वचषक 2026 मोहिमेत गट टप्पातील सर्व सामने जिंकले असून आता सुपर-8 मध्ये त्याची खरी कसोटी लागणार आहे. गतविजेता टीम इंडिया पुढील फेरीत बलाढ्य संघांविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 2024 चा उपविजेता दक्षिण आफ्रिका, तसेच वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे प्रतिस्पर्धी भारतासमोर असणार आहेत. आतापर्यंत भारत या स्पर्धेत अजिंक्य आहे, मात्र या प्रवासात काही उणिवाही स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. सुपर-8पूर्वी त्या दुरुस्त केल्या नाहीत, तर उपांत्य फेरीचा मार्ग कठीण ठरू शकतो.
‘भारताला हरवणं कठीण...’ - आर. अश्विन
भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने भारतीय संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं कौतुक केलं. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही कामगिरीत कुठलीही कमतरता नव्हती, असं त्याने नमूद केलं. सूर्यकुमार यादवने संयमाने डाव सावरला, तर शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी धावगती वाढवण्याची जबाबदारी पार पाडली. अश्विनच्या मते, भारत जेव्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो, तेव्हाही त्याला हरवणं प्रतिस्पर्ध्यांसाठी अत्यंत कठीण असतं.
‘तुम्ही वैभव सूर्यवंशीसारखेही खेळू शकता...’
आर. अश्विनने तिलक वर्माच्या फलंदाजीवरही भाष्य केलं. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या तिलकसाठी ताकदीपेक्षा टायमिंग आणि योग्य प्लेसमेंट अधिक महत्त्वाची असल्याचं त्याने सांगितलं.
“आपण टी-20मध्ये फक्त ताकद आणि मोठे फटके याबद्दल बोलतो. पण बॅटच्या स्वीट स्पॉटवर चेंडू लागणं आणि योग्य टायमिंग ही फलंदाजीची मूलतत्त्वं आहेत. तिलक मोठा पॉवर-हिटर नाही. त्याच्यासाठी योग्य टायमिंग साधणं आणि गॅप शोधणं हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही वैभव सूर्यवंशीसारखे आक्रमक खेळू शकता, पण तिलकसारखं टायमिंगवर आधारित फलंदाजीही तितकीच प्रभावी ठरू शकते,” असं अश्विन म्हणाले.
भारताचे सुपर-8 सामने (Team India Super-8 Matches Schedule 2026)
सुपर-8 मध्ये भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. यानंतर 26 फेब्रुवारीला चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध दुसरा सामना खेळला जाईल. तर या फेरीतील अखेरचा सामना 1 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार आहे.
Team India ದ Game Changers ತಿಲಕ್ ವರ್ಮಾ ಮತ್ತು ವರುಣ್ ಚಕ್ರವರ್ತಿ T20 World Cup 2026 ರ ಗೆಲುವಿನ ಗುರಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮುನ್ನುಗ್ಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. 🏆
— Star Sports Kannada (@StarSportsKan) December 22, 2025
ವೀಕ್ಷಿಸಿ | #T20WorldCup 👉 FEB 7 | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.
[Team India, Surya Kumar Yadav, Tilak Varma, Varun Chakravarthy] pic.twitter.com/OeVAuczSF5
हे ही वाचा-





















