(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Babar Azam Birthday : सर्व कॅप्टन्सनी मिळून साजरा केला बाबरचा वाढदिवस, पाहा केक कापतानाचे खास क्षण
ICC T20 World Cup : उद्यापासून आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरुवात होत असून या निमित्ताने सर्व संघाच्या कर्णधारांनी मिळून एक खास फोटोशूट केलं, याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
Babar Azam Birthday : पाकिस्तान संघाचा कर्णधार कप्तान बाबर आझम (Babar Azam) याचा आज 28 वा वाढदिवस आहे. दरम्यान उद्यापासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी सर्व संघ ऑस्ट्रेलियाचत असून स्पर्धेपूर्वी एका खास फोटोशूटसाठी सर्व संघाचे कर्णधार एकत्र जमले होते. याचवेळी सर्वांनी मिळून बाबर आझमचा वाढदिवस साजरा केला. यावेळी बाबरने केक कापला असून या सर्व सेलिब्रेशनचे फोटो आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर पोस्ट केले आहेत.
आयसीसीनं पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये बाबर आझम हा आयर्लंड, यूएई, नामिबिया आणि नेदरलँड संघाच्या कर्णधारांसोबत केक कापताना दिसत आहे. हे सर्व फोटो शेअर करताना ICC नं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे बाबर आझम. केक भारी दिसत आहे!" बाबर आझमचा केक हिरव्या रंगाचा असून त्यात संपूर्ण गोल मैदान बनवण्यात आलं आहे, त्यात क्रिकेट पिचही बनवला आहे आणि दोन्ही बाजूला स्टंप आहेत. केक कापताना बाबरही अगदी आनंदी असून हसताना दिसत आहे.
पाहा फोटो -
Happy birthday @babarazam258 🎂
— ICC (@ICC) October 15, 2022
That cake looks good! 😋#T20WorldCup pic.twitter.com/JFNeBLoVg5
बाबर आझमची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
बाबर आझम हा तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 42 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 47.3 च्या सरासरीने 3122 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 92 एकदिवसीय सामने खेळताना त्याने 59.79 च्या सरासरीने 4664 धावा केल्या आहेत आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 43.66 च्या सरासरीने 3231 धावा केल्या आहेत. सध्या बाबर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर तो कसोटी आणि टी-20 रँकिगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानने प्रथमच विश्वचषकात भारतीय संघावर विजय मिळवला होता. आता 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान ही टी20 वर्ल्डकपची लढत मेलबर्नमध्ये रंगणार आहे.
टी-20 विश्वचषकासाठी चाहत्यांमध्ये उस्तुकता
"भारत आणि अ गटातील रनर-अप संघ यांच्यातील सुपर-12 फेरीच्या सामन्यांचीही सर्व तिकिटं विकली गेली आहेत. यासोबतच दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झालीय. मात्र, या सामन्यांसाठी आणखी काही तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सुपर-12 फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यांची (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका) जवळपास सर्व तिकिटं विकली गेली आहेत. या सामन्यांची फारच कमी तिकिटं शिल्लक आहेत", असंही आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
हे देखील वाचा -