एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : सराव सामने झाले, आता लक्ष्य वर्ल्डकप, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मेलबर्नला पोहचली टीम इंडिया, VIDEO

Team India in Melbourne : भारतीय संघ विश्वचषकाच्या सामन्यासाठी सज्ज झाला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23ऑक्टोबर रोजी मेलबर्न इथे रंगणार आहे.

Team India for T20 World Cup 2022 : भारतीय संघ (Team India) विश्वचषक (T20 World Cup 2022) सामन्यांसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. सराव सामनेही झाले असून आता थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) महामुकाबल्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये रंगणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडिया नुकतीच मेलबर्नला पोहोचली असून बीसीसीआयनं (BCCI) खेळाडूंचा मेलबर्नला पोहोचतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये आधी सराव सामने असणाऱ्या ब्रिस्बेन येथील एअरपोर्टवर खेळाडू हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर विमानप्रवासा करुन मेलबर्न एअरपोर्टवर खेळाडू उतरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दिसत आहे. काही ऑस्ट्रेलियन फॅन्स टीम इंडियातील खेळाडूंकडून सही घेताना तसंच सेल्फी घेताना दिसत आहेत. 

पाहा VIDEO

भारत आणि पाकिस्तान दोघांनी आपले सराव सामने खेळले असून भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी मात दिली तर पाकिस्तानचा संघ मात्र इंग्लंडकडून 6 विकेट्सनं पराभूत झाला. त्यानंतर दोन्ही संघाचे दुसरे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिले. यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी झाली पण पाकिस्तानचा डाव सुरु होताच पावसाने हजेरी लावली. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाच पावसामुळे सुरु होऊ शकला नाही. आता दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

23 ऑक्टोबरला महामुकाबला

T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. या सामन्याने दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात करतील. या दोन्ही संघांमधील गेल्या वर्षभरातील हा चौथा सामना असेल. गेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने दोनदा, तर भारतीय संघाने एकदा विजय मिळवला आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 News : Superfast News : 8 AM : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaVaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षाRushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
इकडं पालकमंत्रिपदाचा पेच सुटता सुटेना, तिकडं अजितदादा घेणार नाशिकची डीपीडीसी बैठक, महायुतीत नेमकं काय घडतंय?
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? आज होणार मोठा निर्णय, रोहित शर्माचं टेन्शन मिटणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत असणार की नाही? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
Tanaji Sawant Son: तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
तानाजी सावंतांचा मुलगा घरच्यांना न सांगता बँकॉकला का गेला? पुणे पोलिसांनी ऋषिराजचा जबाब नोंदवला
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
संतोष देशमुखांना मारल्यानंतर कराड गँग स्कॉर्पिओ गाडी सोडून पाठीला पाय लावून पळत सुटली; CCTV फुटेज आलं समोर
Nashik News : खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62  विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
खते-बियाण्यांमध्ये भेसळ, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकमध्ये 62 विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
ITR भरणाऱ्यांची संख्या वाढली, गेल्या पाच वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 70 लाखांनी घटूनही सरकारच्या कमाईत जोरदार वाढ
ITR भरणाऱ्यांची संख्या 8 कोटींवर, करदात्यांची संख्या 70 लाखांनी घटली पण सरकारची कमाई वाढली
Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात ‘जीबीएस’चा आणखी एक बळी! एकूण रुग्णांच्या संख्येतही वाढ, 21 जण व्हेंटिलेटरवर
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
Embed widget