SCO vs ZIM T20 WC 2022 : झिम्बाब्वे सुपर 12 मध्ये दाखल, स्कॉटलंडवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय
T20 World Cup 2022 : ग्रुप स्टेजच्या अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडवर 5 विकेट्सनी विजय मिळवत सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवली आहे.
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचे ग्रुप स्टेजचे सुपर 12 साठीचे क्वॉलीफायर सामने आता संपले असून ग्रुप बी मधून झिम्बाव्बे (zimbabwe team) संघ सुपर 12 मध्ये जाणारा अखेरचा संघ म्हणून समोर आला आहे. त्यांनी 3 पैकी 2 सामने जिंकत सुपर 12 मध्ये एन्ट्री मिळवली आहे, आधी आयर्लंडला मात दिल्यानंतर आज झालेल्या स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने (ZIM vs SCO) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. यावेळी त्यांचा स्टार फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, ज्याच्या जोरावर झिम्बाब्वेने 133 धावांचे स्कॉटलंडचे टार्गेट 18.3 षटकांत पूर्ण केले.
Zimbabwe topped the group after wins against Ireland and Scotland to make it to the Super 12 phase 🌟
— ICC (@ICC) October 21, 2022
Details ⬇#T20WorldCuphttps://t.co/UqAKQPw14v
सामन्यात सर्वप्रथम स्कॉटलंड संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत स्कॉटलंडला जास्त हात खोलू दिले नाहीत. पण तरी स्कॉटलंडचा सलामीवीर मुन्से याने 16 व्या षटकापर्यंत क्रिजवर राहत 54 धावांची दमदार खेळी केली. मॅकलॉयडने देखील 25 धावांची खेळी केली, ज्याच्या जोरावर स्कॉटलंडनं 132 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 133 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वे संघाला मात्र हे लक्ष्य सहजासहजी गाठता आले नाही. स्कॉटलंडच्या गोलंदजांनी भेदक गोलंदाजी करत सुरुवातीपासून धावा रोखून ठेवल्या. पण कर्णधार क्रेगने 58 धावांची महत्त्वूपूर्ण खेळी केली. तर स्टार खेळाडू सिंकदर रझाने 40 धावांची जी दमदार खेळी केली, त्याच्या जीवावर अखेर 18.3 षटकांत 5 विकेट्स राखून झिम्बाब्वेचा संघ विजयी झाला.
सुपर 12 कम्प्लिट
सुपर 12 मध्ये आधी असणारे 8 संघ आणि काल ग्रुप A मधून गेलेल्या श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघानंतर अजून 2 संघाची जागा मोकळी होती. ज्यामध्ये ग्रुप B मधून आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे दोन संघ गेले असून त्यामुळे सुपर 12 चे सर्व संघ आता आपल्यासमोर आले आहेत. उद्यापासून सुपर 12 चे सामना रंगणार आहेत.
हे देखील वाचा-