(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK : सुनील गावस्कर यांचा फॅन आहे बाबर आझम, ऑटोग्राफ घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला सुरुवात झाली भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आपआपला सलामीचा सामना एकमेंकाविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहेत.
Babar Azam meets Sunil Gavaskar : ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी पात्रता सामने सुरु असून भारत आधीच सुपर 12 मध्ये असल्याने थेट 23 ऑक्टोबरला मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) भारताचा सलामीचा सामना असून या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंबद्दल विविध चर्चा होत आहेत. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांना भेटला असून या भेटीचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. नुकताच बाबरचा वाढदिवस झाल्यामुळे सुनील गावस्कर यांनी बाबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील यावेळी दिल्या. यानंतर सुनील गावस्कर बाबरला खास टिप्स देत असल्याचंही दिसत आहे. त्यानंतर अखेरीस बाबर एका कॅपवर सुनिल यांचा ऑटोग्राफ घेतानाही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंसोबत संघाचे सध्याचे खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ-
Babar Azam 🇵🇰 meets Sunil Gavaskar 🇮🇳
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 17, 2022
❤️ 🏏 ❤️#T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/aYaB8lu6TJ
सराव सामन्यात भारत विजयी तर पाकिस्तान पराभूत
भारत आणि पाकिस्तान दोघेही सध्या सराव सामने खेळत असून भारतने ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी मात दिली तर पाकिस्तानचा संघ मात्र इंग्लंडकडून 6 विकेट्सनं पराभूत झाला. भारताने सामन्यात आधी फलंदाजी करत 187 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला दिलं. कांगारुनी देखील सुरुवातीपासून संयमी खेळी करत विजयाच्या दिशेने यशस्वी पाठलाग सुरु ठेवला. पण अखेरच्या दोन षटकात भारताच्या शमीसह हर्षलने बाजी पलटवली आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 180 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे भारत सामना 6 धावांनी जिंकला. दुसरीकडे पावसाच्या व्यत्ययामुळं इंग्लंड पाकिस्तान सामना 19-19 षटकाचा खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघानं आठ विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं 14.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रीदी फ्लॉप ठरला. या सामन्यात आफ्रिदीला एकही विकेट्स मिळवता आली नाही.
हे देखील वाचा-