SuryaKumar Yadav Video : झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यानं लगावलेला 'स्कूप शॉट' होतोय व्हायरल, शॉटबद्दल बोलताना सूर्या म्हणतो...
Suryakumar Yadav in T20 WC : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत वेगवान धावा करत असून 5 डावात त्याने 225 धावा केल्या आहेत.
Suryakumar Yadav in T20 World Cup 2022 : यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव धडाकेबाज फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते. विशेष म्हणजे हे सगळे शॉट अगदी हटके होते, पण यातील सर्वोत्तम शॉट शेवटच्या षटकात त्याने खेळला. सूर्याने एका ऑफसाइड फुल टॉस बॉलवर एक अप्रतिम स्कूप शॉट खेळला. या शॉटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण हा शॉट अगदीच हटके होता. सामन्यानंतर, सूर्यकुमारने या शॉटबद्दल बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
स्टार स्पोर्ट्सच्या शो 'फॉलोज द ब्लूज'मध्ये सूर्या म्हणाला, 'गोलंदाज कोणता चेंडू टाकणार आहे हे त्या वेळी आधीच ठरलेले असते हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. मी जेव्हा रबर बॉलने क्रिकेट खेळायचो तेव्हा या शॉटचा जोरदार सराव करायचो, त्यामुळे गोलंदाज काय विचार करत असेल हे तुम्हाला आधी कळालं पाहिजे. जेव्हा मी क्रीजवर असतो तेव्हा मी चेंडूचा वेग लक्षात घेऊन योग्य वेळी फटका मारण्याचा प्रयत्न करतो. बॅटच्या योग्य ठिकाणी चेंडू लागल्यास तो थेट सीमारेषेबाहेर जातो.''
पाहा VIDEO-
Superb Surya!
— ICC (@ICC) November 6, 2022
Iconic moments like this from every game will be available as officially licensed ICC digital collectibles with @0xfancraze.
Visit https://t.co/8TpUHbQikC today to see if this could be a Crictos of the Game. pic.twitter.com/EMo1LVMxKv
सूर्यकुमार यादवचा जबरदस्त फॉर्म
सूर्यकुमार या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं यावर्षी 25 सामन्यात 41.28 च्या सरासरीनं 867 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 184.86 इतका राहिला आहे. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान सूर्याच्या बॅटमधून 52 षटकार निघाले आहेत. तसेच यावर्षी टी-20 क्रिकेटमध्ये 50 हून अधिक षटकार मारणारा सूर्यकुमार यादव एकमेव फलंदाज आहे.सूर्यानंतर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रिझवाननं यावर्षी 19 सामन्यांत 51.56 च्या सरासरीनं 825 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत रिझवानच्या बॅटमधून नऊ अर्धशतके झाली आहेत. रिझवानने 124.62 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-