VIDEO : पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिक झाला भलताच आनंदी, स्टुडिओमध्येच गॉगल घालून नाचू लागला
PAK vs NZ, T20 World Cup 2022 : विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला 7 विकेट्सनी मात देत पाकिस्ताननं फायनल गाठली आहे. ज्यानंतर सर्वच पाकिस्तान संघाचे फॅन्स कमालीचे आनंदी आहेत.
Shoaib Malik Dance : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवत फायनल गाठली आहे. स्पर्धेत सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपेल असं वाटत असताना त्यांनी केलेली ही कामगिरी सर्वच पाकिस्तानच्या फॅन्ससाठी आनंदाचा धक्काच आहे. त्यामुळेच क्रिकेटर शोएब मलिकनेही (Shoaib Malik) डान्स करत आनंद साजरा केला. सामन्यावेळी एका शोसाठी स्टुडिओमध्ये असलेल्या शोएबने पाकिस्तान सामना जिंकताच अगदी बेभान डान्स सुरु केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO-
- Excitement level at #ThePavilion and every Pakistani right now!!!@wasimakramlive @waqyounis99 @realshoaibmalik @captainmisbahpk@falamb3 @asportstvpk #PakvsNz #Cricket #PakistanZindabad pic.twitter.com/JIHRoXZPkT
— Arsalan H. Shah (@arsalanhshah) November 9, 2022
Mood : pic.twitter.com/vQ3WYq6vDp
— Zak (@Zakr1a) November 9, 2022
पाकिस्तान 7 विकेट्सनी विजय
नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर पाकिस्तानच्या बोलर्सनी सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ केवळ 152 धावाच करु शकला. फिन अॅलन 4 तर कॉन्वे 21 धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन 46 धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद 53 धावा केल्या. नीशमनंही नाबाद 16 धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली. ज्यानंतर 153 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं आज सुरुवातच दमदार केली. सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना धडाकेबाज अशी अर्धशतकं ठोकली. बाबर 53 धावा करुन बाद झाला, पण त्यानंतर रिझवानने झुंज कायम ठेवली. मोहम्मद हारिसनेही 30 धावांची साथ रिझवानला दिली. रिझवाननं पाकिस्तानकडून सर्वाधिक 57 धावा केल्या. ज्यानंतर शानच्या नाबाद 3 धावांनी पाकिस्ताननं 19.1 षटकांत सामना जिंकत 7 विकेट्सनी विजय मिळवला.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी सेमीफायनल
आता पाकिस्तान संघाने फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.
हे देखील वाचा-