IND vs SA: द.आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरताच रोहित शर्मानं रचला इतिहास; टी-20 विश्वचषकात अशी कामगिरी पहिलाच
T20 World Cup 2022: याआधी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानच्या (Tillakaratne Dilshan) नावावर हा विक्रम होता.
T20 World Cup 2022: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातलीय. रोहित शर्मा हा टी-20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरलाय. याआधी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानच्या (Tillakaratne Dilshan) नावावर हा विक्रम होता.
ट्वीट-
🚨 Milestone Unlocked 🔓
— BCCI (@BCCI) October 30, 2022
3⃣6⃣ & going strong - Most Matches (in Men's Cricket) in #T20WorldCup ! 💪 💪
Congratulations to #TeamIndia captain @ImRo45 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 #INDvSA pic.twitter.com/OHOuIzJ2Ue
रोहित शर्माची खास विक्रमाला गवसणी
रोहित शर्मा हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा आज (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 36वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलला होता. याबाबतीत त्यानं श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडला आहे. तिलकरत्ने दिलशाननं टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 35 सामने खेळले आहेत. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शाकीबनं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 34 सामने खेळले आहेत. याचबरोबर सर्वाधिक टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीतही रोहित शर्मा आणि शाकीब अल हसन अव्वल आहेत. दोघंही आठव्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचं लोटांगण
पर्थ क्रिकेट स्टेडियवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 विश्वचषकातील सुपर-12 फेरीतील सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहित शर्माचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, अवघ्या 50 धावांच्या आत भारताचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतला आहे. रोहित शर्मानं (14 चेंडूत 15 धावा), केएल राहुल (14 चेंडू 9 धावा), विराट कोहली (11 चेंडू 12) दिपक हुडा (3 चेंडू शून्य धाव), हार्दिक पांड्या दोन धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने (Lungi ngidi) तब्बल चार विकेट्से घेतले. तर, नॉर्खियाच्या खात्यात एक विकेट्स घेतली.
हे देखील वाचा-