Dinesh Karthik : कार्तिक दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही, बांग्लादेशविरुद्ध ऋषभ पंत घेणार जागा!
T20 WC 2022 : भारताने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध जिंकले. पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव पत्कारावा लागल्यामुळे आता बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाच आहे.
Team India Playin 11 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका संघाने 5 विकेट्सने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात पाठीला दुखापत झाल्याने दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) सामन्याच्या मध्येच बाहेर जावे लागले होते. त्याच्या जागी ऋषभ पंतने (Rishabh Pant) उर्वरित सामन्यात विकेटकीपिंग केले. दरम्यान कार्तिक अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने बुधवारी होणाऱ्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार नाही. ज्यामुळे पंतला संधी दिली जाणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, “दिनेश कार्तिकच्या पाठीत अजूनही दुखत आहे. कार्तिकच्या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. दिनेश कार्तिकला योग्य उपचार दिले जातील, त्याची काळजी घेतली जात आहे.'' दरम्यान या माहितीतून कार्तिकची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याचं समोर आल्यामुळे बांग्लादेशविरुद्ध जवळपास कार्तिक मैदानात उतरणार नाहीत. दरम्यान त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते.
कशी असू शकतो दोन्ही संघाची संभाव्य 11?
संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह
स्पर्धेत भारताला रविवारी दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाला 5 विकेट्सच्या फरकाने सामना गमवावा लागला. दरम्यान या पराभवामुळे भारताचं गुणतालिकेत पहिलं स्थानही गेलं असून आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्याने भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. ज्यामुळे उर्वरीत दोन सामने जिंकून आरामात सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण सोबतच इतर संघ कशी कामगिरी करतील हे देखील महत्त्वाचं असेल. शिवाय ऑस्ट्रेलियात पावसाचा व्यत्यय सामन्यांमध्ये येत आहे, भारताच्या उर्वरीत दोन सामन्यातही पाऊस आला आणि सामने झाले नाहीत, तर देखील भारताचं पुढे जाणं अवघड होऊ शकतं.
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णीत | गुण | नेट रनरेट |
1 | दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 0 | 1 | 5 | 2.772 |
2 | भारत | 3 | 2 | 1 | 0 | 4 | 0.844 |
3 | बांग्लादेश | 3 | 2 | 1 | 0 | 4 | -1.533 |
4 | झिम्बाब्वे | 3 | 1 | 1 | 1 | 3 | -0.050 |
5 | पाकिस्तान | 3 | 1 | 2 | 0 | 2 | 0.765 |
6 | नेदरलँड्स | 3 | 0 | 3 | 0 | 0 | -1.948 |
हे देखील वाचा-