Namibia Win : मैदानातच खेळाडूंचे डोळे पाणावले, श्रीलंकेवर ऐतिहासिक विजयानंतर नामिबियाचा कर्णधारही झाला भावूक
SL vs NAM : टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी दमदार असा विजय मिळवला.

Sri Lanka Vs Namibia, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून सुरुवात झाली असून स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी (SL vs NAM) विजय मिळवला आहे. नुकताच आशिया कप जिंकलेल्या श्रीलंकेला नवख्या नामिबियाने मात दिल्याने यंदाचा विश्वचषक रंगतदार असणार याचं ट्रेलरच जणू सर्वांना दिसला आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक विजयानंतर नामिबियाचे खेळाडू कमालीचे भावूक झाले होते. मैदानातच त्यांचे डोळे पाणावले असून आयसीसीनं पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हे दिसून येत होतं.
कर्णधार झाला भावूक
वर्ल्डकप क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करत इतिहास रचला ज्यानंतर नामिबियाचा कर्णधार गेराड इरॉसमस भावूक झाला तो म्हणाला की, ''हा अविश्वसनीय प्रवास असून मागील वर्षीचा विश्वचषक आमच्यासाठी विशेष अनुभव होता. यंदा दणदणीत विजयाने आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली असून अजूनही बरीच कामं बाकी आहेत. आमच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून आम्हाला सुपर 12 मध्ये स्थान मिळवायचं आहे.
पाहा फोटो-
A day Namibia won't forget anytime soon 😍#T20WorldCup pic.twitter.com/KCdzxUORsb
— ICC (@ICC) October 16, 2022
सामन्याचा लेखा-जोखा
सामन्यात सर्वप्रथम टॉस जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे नामिबियाचे खेळाडू प्रथम फलंदाजी करायला मैदानात आले, त्यांची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर अनुक्रमे 3 आणि 9 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर इटॉन आणि बार्ड यांनी अनुक्रमे 20 आणि 26 धावांचं योगदान देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्णधार इरॉसमसने 20 धावां केल्या. त्यानंतर जॅन फ्रायलिंकने 28 चेंडूत 4 चौकार खेचत 44 रन केले. तर शेवटच्या फळीतील फलंदाज स्मिटने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार टोकत 31 रन केले. ज्यामुळे नामिबियाने 164 धावांचे लक्ष्य श्रीलंकेला दिले. श्रीलंकेकडून प्रमोद मधुशनने दोन तर महेश थीक्षना, चमीरा आणि करुणारत्ने यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 164 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला खास कामिगरी करता आली नाही. कर्णधार दासुनने सर्वाधिक 29 धावा केल्या तर भानुका राजपक्षाने 20 धावा केल्या पण दोघांच्या बाद झाल्यानंतर पुढील फलंदाजांना डाव सावरता आला नाही आणि संपूर्ण संघ 108 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे नामिबियाने 55 धावांनी सामना जिंकला.
हे देखील वाचा-
T20 World Cup 2022 : बुमराहशिवाय टीम इंडियाचं कसं होणार? कशी असेल रणनीती? कसा असेल बोलिंग अटॅक?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
