एक्स्प्लोर

IND vs NZ : दुखापतीमुळे पंड्या सामन्याबाहेर, 'या' खेळाडूला संधी; शार्दूलही प्लेईंग 11 च्या बाहेर?

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमी (Mohamamed Shami) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.

India vs New Zealand : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा मध्ये आजच्या सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघानी सलग चार विजय मिळवल्यानंतर आता यजमान भारत आणि गतविजेता न्यूझीलंड यांच्या नजरा विजयाच्या पाचव्यासह उपांत्य फेरीतील स्थान मजबूत करण्याकडे असतील. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामी (Mohamamed Shami) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून दोन्ही संघांकडे समान आठ गुण आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघामध्ये लढत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 

पंड्या आणि शार्दूलच्या जागी 'या' खेळाडूंना संधी

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला दुखापत झाली, त्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादव मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामीला संधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

सरावादरम्यान सूर्याला दुखापत

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सर्व खेळाडू सरावासाठी धर्मशाला मैदानावर पोहोचले होते. यावेळी, सूर्यकुमार यादव नेटमध्ये थ्रो-डाऊनद्वारे फलंदाजीचा सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. सरावादरम्यान, चेंडू त्याच्या उजव्या हाताला लागला, त्यानंतर सूर्यकुमार यादवला खूप वेदना होत होत्या आणि तो लगेच नेटमधून बाहेर आला आणि डॉक्टरकडे गेला. फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर सूर्यकुमारला बरं वाटलं, त्याची दुखापत किरकोळ होती, अशी माहिती समोर आली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट

क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Rain Prediction) आहे. अ‍ॅक्यू वेचर (Accuweather) च्या रिपोर्टनुसार, पावसामुळे आज भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (Dharamshala Weather Update) शक्यता 40 टक्के आहे. दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते.

दोन्ही संघांची प्लेईंग 11

भारत  : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Rohit Sharma: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
India tour of Australia 2025 Squad: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार
Rohit Sharma: रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं की स्वतःहून राजीनामा दिला? अजित आगरकरांनी स्पष्ट शब्दात केला खुलासा!
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या
India tour of Australia 2025 Squad: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-20 आणि वनडेमध्येही स्थान मिळवणारे ते 7 नशीबवान कोण! मोहम्मद शमीनं काय पाप केलं?
Rohit Sharma Virat Kohli : रोहित शर्मा अन् विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळणार की नाही? अजित आगरकरच्या वक्तव्यानं चाहत्यांना धक्का
रोहित अन् विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? अजित आगरकरच्या वक्तव्यानं चाहत्यांना धक्का
महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र
महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र
रोहित विराटची वापसी, कॅप्टन बदलला, बंडखोर श्रेयसला लाॅटरी, हार्दिकच्या जागी सुद्धा आश्चर्यकारक निवड! बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीच्या 5 तगड्या निर्णयांची चर्चा
रोहित विराटची वापसी, कॅप्टन बदलला, बंडखोर श्रेयसला लाॅटरी, हार्दिकच्या जागी सुद्धा आश्चर्यकारक निवड! बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीच्या 5 तगड्या निर्णयांची चर्चा
IND vs AUS : श्रेयसचं प्रमोशन, जडेजा अन् सॅमसनला डच्चू, शतकवीर जुरेलला लॉटरी, शमीचं करिअर संकटात, संघ निवडीचे पाच अर्थ
श्रेयसचं प्रमोशन, जडेजा अन् सॅमसनला डच्चू, शतकवीर जुरेलला लॉटरी, शमीचं करिअर संकटात, संघ निवडीचे अर्थ
Embed widget