T20 World Cup, 2022 : 'पंत, केएल नाही तर 'हा' खेळाडू वर्ल्डकपसाठी यष्टीरक्षक म्हणून हवा,' हरभजनने स्पष्टचं सांगितलं
ICC T20 World Cup, 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकासाठी कोणाकोणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल.
Harbajan Singh : आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर काही महिन्यात टी20 विश्वचषक पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी द्यायला हवी असं विधान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने केलं आहे. स्टार स्पोर्ट्सच्या गेमप्लॅन या कार्यक्रमात बोलताना हरभजनने हे विधान केलं आहे.
क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल 2022 स्पर्धा उत्साहात पार पडत आहे. सर्वच सामने चुरशीचे होताना दिसत आहेत. एकीकडे दिग्गज संघ मुंबई, चेन्नई स्पर्धेबाहेर गेले असले तरी लखनौ, गुजरात या नवख्या संघासह बंगळुरुचा संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. दरम्यान बंगळुरु संघाकडून उत्तम कामगिरी करणाऱ्या दिनेशचं सर्वच कौतुक करत असताना हरभजनने तर थेट दिनेशला वर्ल्डकपमध्ये संधी द्यावी असंच विधान केलं आहे. हरभजन म्हणाला, ''हरभजन आरसीबीकडून दमदार कामगिरी करत आहे. लेग शॉटच्या दिशेचे दिनेशचे शॉट अगदी अप्रतिम असतात. जेव्हाही सामना फिनिश करायची जबाबदारी त्याच्याकडे येते तो नक्कीच ती पार पाडतो. माझ्यामते सध्या भारतीय संघात तो बेस्ट फिनिशर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकात त्याला नक्कीच संधी मिळायला हवी.”
हार्दिकही संघात हवा
हरभजन सिंह याने याआधी हार्दिक पांड्यावर स्तुतीसुमनं उधळत त्याच्यासारखा खेळाडू 2022 च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघात असायलाच हवा असं विधान केलं होतं. स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Live कार्यक्रमात बोलताना हरभजनने हे विधान केलं होतं. हार्दिक कर्णधार असणाऱ्या गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत सर्वात आधी प्लेऑफममध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे फ्रंट फुटवर येऊन संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिकच हरभजन सिंहने कौतुक करत 2022 च्या टी20 विश्वचषकात हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात असायला हवा असं तो म्हणाला होता.
हे देखील वाचा-