Pat Cummins : केकेआरला मोठा झटका, पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Pat Cummins Ruled out: कोलकाता नाईट रायडर्स संघातील महत्त्वाचा खेळाडू पॅट कमिन्स उर्वरीत आयपीएलचे सामने खेळू शकणार नाही, तो लवकरच मायदेशी परतणार आहे.
![Pat Cummins : केकेआरला मोठा झटका, पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर Pat Cummins ruled out of IPL 2022 due to injury kkr team in tension Pat Cummins : केकेआरला मोठा झटका, पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/6468e5cf51ba76f88510e6fd786b20ee_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pat Cummins Ruled out : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यात आता त्यांचा महत्त्वाचा खेळाडू पॅट कमिन्स (Pat Cummins) देखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. कमिन्सला हिप इंजरी झाल्यामुळे तो लवकरच मायदेशी परतणार आहे. या हंगामातही पॅटने खास कामगिरी केलेली नाही. मूळात त्याला अधिक सामने खेळायला देखील मिळाले नसून त्याने केवळ 5 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्त्व केले. या 5 सामन्यात पॅटने 7 विकेट्स मिळवले असून एक दमदार असं अर्धशतकही ठोकलं.
श्रेयस अय्यर कर्णधार असलेली केकेआर सध्या गुणतालिकेत 12 पैकी केवळ 5 सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. संघाने हंगामाची सुरुवात दमदार केली होती, पण मध्यंतरी काही सामने सलग पराभूत झाल्याने संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूने अर्थात ऑस्ट्रेलिया क्रिकेटने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान केकेआरने आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
पॅटचं यंदा सुमार प्रदर्शन
कोलकाता नाईट रायडर्स संघाने यंदा देखील पॅटला संघात सामिल केलं होतं. तब्बल 7.25 कोटी रुपये देत त्यांनी पॅटला विकत घेतलं. त्यानंतर त्याने यंदाच्या हंगामात 5 सामने खेळत यावेळी 7 विकेट्स घेत 63 रन केले आहेत. विशेष म्हणजे त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात दमदार अर्धशतक झलकावत संघाला विजय मिळवून दिला होता. कमिन्सच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार करता त्याने 42 सामने खेळत 45 विकेट्स घेतले आहेत. तसच 379 रन देखील केले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. 26 षटकार आणि 24 चौकार पॅटच्या बॅटमधून आले आहेत.
हे देखील वाचा-
- IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू
- Most wickets in IPL: आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)