IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधीक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू
जोस बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सध्या बटलकरडे ऑरेंज कॅप आहे.
![IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधीक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू Ipl 2022 orange cap jos buttler lead run scorer in ipl 2022 after mi vs csk match IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधीक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/06e091581a902a1e9f352a5431ecf3aa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Orange Cap : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सध्या बटलकरडे ऑरेंज कॅप आहे. या मोसमात बटलर चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. या मोसमात बटलरने 12 सामन्यांमध्ये 56.82 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 149.88 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याच्या आसपास दुसरा फलंदाजही नाही.
आयपीएलच्या या हंगामात बटलरनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल आहे. दोन शतकांसह के एल राहुलने आत्तापर्यंत 459 धावा केल्या आहेत. तो सध्या धावा करणाऱ्या फलदांजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नरने केवळ 10 सामन्यांत 427 धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधीक धावा करणारे खेळाडू
जोस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्याने 12 सामन्यात 625 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 149.88 चा आहे. त्यानंतर के एल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुलने 12 सामन्यात 459 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 140.36 एवढा आहे. त्यानंतर डेविड वॉर्नर हा तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 10 सामन्यात 427 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 152.50 एवडा आहे. तर चौथ्या क्रमांकावर डु प्लेसिस आहे. त्याने 12 सामन्यात 389 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा 132.76 एवढा आहे. तर पाचव्या स्थानी शुभमन गिल आहे. शुभमन गिलने 12 सामन्यात 384 धावा केल्या असून , 137.14 एवढा स्ट्राइक रेट आहे.
आयपीएल (IPL) 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. तर 3 संघ लवकरच अंतिम लढतीसाठी सज्ज होतील. प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. चालू हंगामात आत्तापर्यंत सर्वात जास्त विकेट युझवेंद्र चहलने आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)