IND vs SA, Playing 11 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका बदलासह टीम इंडिया मैदानात, अक्षरच्या जागी दीपक हुडाला संधी
IND vs SA : ऑस्ट्रेलियातील पर्थमधील क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी निवडली आहे.
India vs South africa, Playing 11 : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) सामन्याला सुरुवात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली असून अंतिम 11 मध्ये एका बदलासह भारत मैदानात उतरत आहे. भारताने अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) विश्रांती देत दीपक हुडाला (Deepak Hooda) संघात संधी दिली आहे.
आज होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South africa) यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रुप 2 मध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात असून आज जिंकणारा संघ आणखी मजबूत आघाडी घेईल. ग्रुप 2 गुणतालिकेतूनसेमीफायनलमध्येही पोहोचण्यासाठी दोघांना आजचा विजय अत्यंत फायदेशीर असेल.
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक बदलांसह आपला संघ मैदानात उतरवला आहे. भारतानं अष्टपैलू अक्षर पटेलला विश्रांती देत दीपक हुडाला संघात घेतलं आहे. अक्षरच्या जागी पंतला संधी मिळेल असं वाट होतं, पण दीपकला संधी देत टीम इंडियानं काहीसा वेगळा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघानेही भारताविरुद्ध फिरकीपटू न उतरवता आणखी एक वेगवान गोलंदाद संघात घेतला आहे. तबरेज शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीला संधी दिली आहे.
कशी आहे टीम इंडिया?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, दीपक हुडा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
कसा आहे दक्षिण आफ्रिका संघ?
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी.
🚨 Toss & Team News from Perth 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa. #T20WorldCup | #INDvSA
— BCCI (@BCCI) October 30, 2022
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6
1⃣ change to our Playing XI as @HoodaOnFire is named in the team 🔽 pic.twitter.com/X9n5kLoYNn
हे देखील वाचा