एक्स्प्लोर

IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर

World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे.

India vs New Zealand : यजमान भारताने (Team India) न्यूझीलंड (New Zealand) चा पराभव करत विश्वचषकात (ODI World Cup 2023) सलग पाचवा विजय मिळवला आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या तुफान खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला धूळ चारली. या सामन्यात कोहलीने 95 धावांची विजयी खेळी केली, तर मोहम्मद शामी (Mohammed Shami) ने फलंदाजींची नाचक्की करत पाच विकेट घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे.

तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकात पराभव

धर्मशाला येथील सामन्या न्यूझीलंडने 273 धावा केल्या. भारतासमोर 274 धावांचं आव्हन असताना भारताने दमदार खेळी करत 48 षटकांमध्ये सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार ठोकत 46 धावांची उत्तम खेळी केली. कोहलीने आठ चौकार आणि दोन षटकार ठोकत 95 धावांची दमदार खेळी केली. तर शामीने विकेटचा 'पंच' मारत न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या सामन्यात पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यात कोणते विक्रम रचले गेले आहेत जाणून घ्या.

सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा खेळाडू

मोहम्मद शामीने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शामीने 10 षटकात 54 धावा दिल्या. शमीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. यासोबतच शामीने एक विशेष कामगिरी केली आहे. यावर्षी भारताकडून खेळताना सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा शामी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यंदा शामीने तीन वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला आहे. तर, विराट कोहली चार वेळा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके

विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली. या दमदारसह कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने 137 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावे 136 वेळा अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आहे. सर्वाधिक अर्धशतके झळकावण्यात रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 167 अर्धशतके आहेत.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा जास्त धावा

कोहलीने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहली 95 धावांवर बाद झाला. 90 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही 7वी वेळ होती. मोहम्मद अझरुद्दीन आणि शिखर धवन यांनीही 7-7 वेळा अशी कामगिरी केली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 वेळा 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि या काळात तो बाद झाला.

दोन हजार धावांचा टप्पा जलद पार करण्याचा विक्रम

शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला भीम पराक्रम केला आहे. गिलने वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. त्याने 40 सामन्यात हा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suryakumar Yadav : एकदिवसीय विश्वचषकात 'सूर्या'चं पदार्पण! पण अवघ्या दोन धावांवर रनआऊट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget