एक्स्प्लोर

IND vs AFG : आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने; सामन्यावर पावसाचं सावट? दिल्लीतील हवामान कसं असेल?

World Cup 2023 : आज दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान सामना रंगणार असून या सामन्यावर वेळी पावसाची शक्यता आहे का आणि हवामान कसं असेल, हे जाणून घ्या.

India vs Afghanistan, WC 2023 : विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) सामना रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) ने विश्वचषकाची (ICC World Cup 2023) सुरुवात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या विजयी सलामीने केली आहे. अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Team) संघाला सलामी सामन्यात बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघ विश्वचषकातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) वर दुपारी दोन वाजता आजचा सामना पार पडणार आहे. या साम्न्यावेळी दिल्लीतील हवामान कसं असेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

IND vs AFG, Delhi Weather Forecast : सामन्यावेळी दिल्लीतील हवामान कसं असेल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. आज दिल्लीत हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत पावसाची शक्यता नाही. दिल्लीत बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हवेची गुणवत्ता 'खराब' श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.

आज दिल्लीत हवामान अंशतः ढगाळ असेल पण पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19-23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे चाहते आजच्या सामन्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील.

सुरुवातीच्या फळीतील फलंदाजांवर दबाव

टीम इंडिया पुन्हा एकदा त्यांचा स्टार सलामीवीर शुभमन गिलशिवाय मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल आजारपणामुळे वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामी सामन्यात भारताची सुरुवातीची फळी फेल ठरली. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल दमदार खेळी करत 200 धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या इतर बातम्या :

World Cup 2023 : विश्वचषकाच्या पदार्पणातच गोल्डन डक, शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेल्या ईशान किशनची बॅट चालणार?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget